शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे बजेटवर शिवसेना असमाधानी

By admin | Updated: February 26, 2015 15:38 IST

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी मांडलेल्या रेल्वे बजेटवर सत्ताधारी एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने नाराजी दर्शवली.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २६ - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी मांडलेल्या रेल्वे बजेटवर सत्ताधारी एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने नाराजी दर्शवली. प्रभू यांनी मांडलेले रेल्वे बजेट समाधानकारक नाही अशी टीका शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी बोलून दाखवली. सुरेश प्रभू यांनी आपल्या रेल्वे बजेटमध्ये विविध प्रोजेक्टची घोषणा केली खरी पण या प्रोजेक्टसाठी पैसा कोठून आणणार आहात असा प्रश्न विचारीत किर्तीकर यांनी रेल्वे बजेट सर्वसामान्यांची निराशा करणारे असल्याचे म्हटले. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले सुरेश प्रभू यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले होते. भू- संपादन विधेयकावरुन भाजप व शिवसेनामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता शिवसेनेने रेल्वे बजेटवर नाराजी दर्शवल्याने या दोन्ही पक्षात पूढील काळात आणखी संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मांडलेले रेल्वे बजेट हे चांगले आहे पण समजण्यास कठिण आहे असे म्हणत औरंगाबादचे सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी रेल्वे बजेटची खिल्ली उडवली.