आरोग्य सेविकांची पाच हजार रुपयांवरच बोळवण शिवसेना-भाजपा युतीने केली फसवणूक
By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST
आरोग्य सेविकांची पाच हजार रुपयांवरच बोळवण
आरोग्य सेविकांची पाच हजार रुपयांवरच बोळवण शिवसेना-भाजपा युतीने केली फसवणूक
आरोग्य सेविकांची पाच हजार रुपयांवरच बोळवणशिवसेना-भाजपा युतीने केली फसवणूकसोमवारी बेमुदत आंदोलनमुंबई : आरोग्य सेविकांना तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत वेतनवाढ देण्याचे शिवसेना-भाजपा युतीचे आश्वासन म्हणजे निवडणुकीनंतर खुशीचे गाजर ठरले आहे़ विधानसभा निवडणुकीनंतर पाच हजार रुपयांवरच बोळवण करण्यात आल्यामुळे संतप्त आरोग्य सेविक सोमवारी आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरु करणार आहेत़आरोग्य केंद्र, लसीकरण मोहीम, जनगणना व अशा अनेक छोट्या-छोट्या कामांसाठी अवघ्या अडीच ते तीन हजार रुपयांमध्ये आरोग्य सेविका काम करीत असतात़ त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या काळात युतीने घेतला़ मात्र सत्तेवर आल्यानंतर शिवसेना-भाजपाने या आरोग्य सेविकांना पाच हजार रुपये मानधन देत त्यांच्या तोंडाला पानं पसुली आहेत़ युतीने केलेल्या या फसवणुकीच्या निषेधार्थ ३६०० आरोग्य सेविका महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरु करणार आहेत़ यात पालिका महासभेत मंजूर झाल्याप्रमाणे दहा हजार रुपये मानधन, दोन हजार रुपये मासिक निवृत्ती वेतन, पालिकेतील रिक्त पदावर सामावून घेणे अशा मागण्यांचाही समावेश आहे़ (प्रतिनिधी)