शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

शिवसेना-भाजपातच जुंपली!

By admin | Updated: October 7, 2014 05:21 IST

राज्यात सत्ता मिळावी म्हणून पाच वर्षे स्वप्न पाहणाऱ्या भाजपा शिवसेनेमध्येच आपापसात अनेक मतदारसंघात जुंपल्याचे चित्र आहे

अतुल कुलकर्णी, मुंबईराज्यात सत्ता मिळावी म्हणून पाच वर्षे स्वप्न पाहणाऱ्या भाजपा शिवसेनेमध्येच आपापसात अनेक मतदारसंघात जुंपल्याचे चित्र आहे. त्यातच शिवसेनेने सभा, सोशल मीडियातून भाजपालाच लक्ष्य करणे सुरु केले आहे़ त्यामुळे पुन्हा मागच्याच निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याच्या भीतीने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची चिंता वाढली आहे. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने मराठीचा मुद्दा काढला आणि त्यांच्या सभांनी वातावरण तयार केले होते. शिवसेनेनेदेखील मनसेलाच लक्ष्य केले़ ‘‘आपला शत्रू कोण हे ठरवा, मनसेवर काय बोलायचे ते आम्ही बोलतो, तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात बोला’’, असा स्पष्ट फोन भाजपा नेते नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना काही मोजक्या पत्रकारांसमोर केला होता. तरीही तेव्हा टीकेचे लक्ष्य मनसेच राहिली आणि मराठी मतं मोठ्या प्रमाणावर विभागली गेली. ज्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. याचीच आठवण आता भाजपा नेत्यांना होत आहे. युती तोडताना आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले़ पण शिवजयंतीच्या नावाने वर्गण्या गोळा करत कोण फिरतो, अशी बोचरी टीका त्यांनीच केली. त्यावर सेनेने प्रत्युत्तर देत हे भांडण चालू ठेवले आहे. ‘अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ या जाहिरातीची सोशल मीडियातून शिवसेनेने जेवढी खिल्ली उडवली तेवढी तर काँग्रेसनेदेखील उडवलेली नाही. ज्या व्हॉटस्अ‍ॅपने मोदींना तरुणांमध्ये लोकप्रिय केले़ त्याच व्हॉटस्अ‍ॅपवरदेखील भाजपा सेनेची नळावरच्या भांडणासारखी जुंपली आहे. असाच काहीसा प्रकार काँग्रेस-राष्ट्रवादीत सुरु झाला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मांडीला मांडी लावून यापुढे बसणार नाही, अशी घोषणा अजित पवार यांनी करुन टाकली, तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री करणार नाही, त्यांना हवी ती खातीदेखील देणार नाही, असे चव्हाणांनी घोषित केले. पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी कोल्हापुरात तळ ठोकून दोन्ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये पडद्याआड दिलजमाई घडवली आहे. त्यामुळे आर.आर. पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम ही मंडळी सेफ झाल्याची चर्चा असली तरी मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसे या दोघांची भांडणे गंभीर वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बॅडमिंटन दुहेरीचा सामना चालू आहे आणि त्यात एका बाजूला शिवसेना-भाजपा आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आपापसात लढत आहे. पंच मात्र सामना कधी सुरु होणार याची वाट पहातोय, असे व्यंगचित्र काही दिवसापूर्वी प्रकाशित झाले होते. या परिस्थितीत अजूनही म्हणावा तेवढा फरक पडलेला नाही.