शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

'ती' कापलेले गुप्तांग घेऊन पोलिस स्थानकात आली

By admin | Updated: February 11, 2016 21:07 IST

मध्यप्रदेशात एक ३२ वर्षीय महिला बलात्कार करणा-या दीराचे गुप्तांग कापून पुरावा म्हणून ते गुप्तांग पोलिस स्थानकात घेऊन गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली.

ऑनलाइन लोकमत 

भोपाळ, दि. ११ - मध्यप्रदेशात एक ३२ वर्षीय महिला बलात्कार करणा-या दीराचे गुप्तांग कापून पुरावा म्हणून ते गुप्तांग पोलिस स्थानकात घेऊन गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. बलात्कार करणा-या दीराला रोखण्याचा हाच एकमेव मार्ग होता असा दावा या महिलेने केला. 
पोलिस घटनास्थळी वैद्यकीय मदत घेऊन पोहोचण्याआधीच त्या इसमाने आत्महत्या केली. गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास सिद्धी जिल्हयातील चुराहट भागात ही घटना घडली. महिला कापलेले गुप्तांग घेऊन तीन मुलांसह पोलिस स्थानकात येताच तिथे एकच गोंधळ उडाला. 
या महिलेचा पती नाशिकमध्ये नोकरीला आहे. ही महिला तिची मुले आणि दीरासह इथे रहात होती. या महिलेचा दीर तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून बलात्कार करत होता असे पोलिसांनी सांगितले. नेहमीप्रमाणे दीराने आज माझ्यावर जबरदस्ती केली. तेव्हा मी त्याला माझी सहमती आहे असे दाखवले नंतर एकाक्षणी धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांग कापले असे या महिलेने पोलिसांना सांगितले. 
या महिलेच्या दीराने घराजवळ असलेल्या झाडाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली. या महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.