नवी दिल्ली : गुप्तचर विभागाचे (आयबी) विद्यमान विशेष संचालक दिनेश्वर शर्मा यांची शनिवारी विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली़ येत्या 1 जानेवारीला ते आयबी प्रमुखपदाचा पदभार स्वीकारतील़ ते सय्यद आसीफ इब्राहिम यांची जागा घेतील़ केरळ कॅडरच्या 1979 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले दिनेश्वर शर्मा गत 23 वर्षापासून आयबीसोबत काम करीत आहेत़