शरद पवारांचा केसरकरांना धक्का
By admin | Updated: May 12, 2014 19:48 IST
राग कायम : कार्यक्रम पत्रिकेतील नाव काढले; कृषी भवनासमोरील नावांची पाटीही बदलली अनंत जाधव / सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांनी आघाडीच्या उमेदवाराविरोधात उघडपणे बंड केल्यानंतर खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व अध्यक्ष शरद पवार यांनीच दीपक केसरकर यांची कोंडी केली आहे. अनेक मंत्र्यांच्या विनवणीनंतरही पक्षाध्यक्षांनी केसरकर यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेत तसूभरही बदल ...
शरद पवारांचा केसरकरांना धक्का
राग कायम : कार्यक्रम पत्रिकेतील नाव काढले; कृषी भवनासमोरील नावांची पाटीही बदलली अनंत जाधव / सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांनी आघाडीच्या उमेदवाराविरोधात उघडपणे बंड केल्यानंतर खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व अध्यक्ष शरद पवार यांनीच दीपक केसरकर यांची कोंडी केली आहे. अनेक मंत्र्यांच्या विनवणीनंतरही पक्षाध्यक्षांनी केसरकर यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेत तसूभरही बदल केलेला नाही. तसेच बुधवारी सिंधुदुर्गमध्ये होणार्या शरद कृषी भवनच्या उद्घाटन पत्रिकेतून आमदार केसरकर यांचे नाव काढले आहे. त्यामुळे खुद्द पवारच आमदार केसरकर यांना धक्का देण्याच्या विचारात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.आमदार दीपक केसरकर यांनी दहशतीचा मुद्दा पुढे करीत ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हादरा दिला होता. शेवटच्या क्षणापर्यंत आमदार केसरकर व त्यांचे समर्थक काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी बाहेर पडले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण द्वयींची सावंतवाडीत जाहीर प्रचार सभा झाली. मात्र, आमदार केसरकरांनी या सभेला जाण्याचे टाळत पक्षाध्यक्ष पवार यांची एकांतात भेट घेतली होती. या भेटीवेळी घडलेला प्रकार सर्वांसाठीच धक्कादायक होता. त्याचे पडसाद नंतर झालेल्या जाहीर सभेत उमटले. पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांची पदावरून हकालपी केली. तर केसरकरांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्याचे ठरले होते.केसरकरांबाबतचा राग पवारांच्या मनातून अद्याप गेलेला दिसत नाही. आगामी विधानसभा निवडणुकांबाबत दोन दिवसांपूर्वीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईत झालेल्या बैठकीवेळी अनेक मंत्र्यांनी केसरकरांच्या कृतीचे समर्थन केले होते; पण पक्षाध्यक्ष पवार यांची नाराजी कायम राहिली, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.त्यातच पक्षाध्यक्ष पवार हे नव्याने संघटना बांधणीसाठी १४ मे रोजी सिंधुदुर्गमध्ये येत आहेत. शरद कृषी भवनचे उद्घाटन तसेच संघटनात्मक बैठका असे या दौर्याचे स्वरूप आहे. कृषी भवनाच्या कार्यक्रम पत्रिकेत आमदार केसरकर यांचे नाव घालण्याबाबत पक्षात एकमत नाही. तसेच शरद कृषी भवन या वास्तूसमोरील आमदार दीपक केसरकर यांच्यासह अन्य नावांचा समावेश असलेली पाटीही बदलण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्ात राष्ट्रवादीचे नव्याने नियुक्त केलेले पदाधिकारी मुंबईत गेले होते. त्यावेळी पक्षाध्यक्षांनी आमदार केसरकर यांच्या कृतीबाबत उघड नाराजी व्यक्त करून पत्रिकेत त्यांचे नाव घालण्याबाबत आक्षेप घेतला होता. शरद कृषी भवनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दोन दिवसांवर आला असून, पत्रिकेत जिल्ातील एकमेव राष्ट्रवादीच्या आमदाराचे नाव नसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.बंड येणार अंगलट!आमदार दीपक केसरकर यांनी दहशतीच्या नावाखाली बंड केले खरे; पण सद्य:परिस्थितीत हे बंड त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. केसरकर हे कार्यक्रमस्थळी जाऊनही पक्षाध्यक्षांंनी आपली भूमिका कायम ठेवली, तर आमदार केसरकरांना पुढचा काळ कसोटीचा जाणार असून, लोकसभा निवडणुकीतील बंड अंगलट येण्याची शक्यता आहे.