शरद जोशी निधन...गिरीश बापट यांची प्रतिक्रिया
By admin | Updated: December 13, 2015 00:07 IST
शरद जोशी यांच्या निधनाने शेतकर्यांचा पाठीराखा हरपला आहे़ शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते आयुष्यभर संघर्ष करत राहिले. त्यांनी शेतकरी, शेतमजुरांबरोबरच सामान्य माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला. शेतकर्यांनी आधुनिकतेची कास धरावी यासाठी ते आग्रही होते. शासनाने शेतमालाला योग्य दर द्यावा हा आग्रह धरताना संसदेतही त्यांनी शेतकर्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. - ...
शरद जोशी निधन...गिरीश बापट यांची प्रतिक्रिया
शरद जोशी यांच्या निधनाने शेतकर्यांचा पाठीराखा हरपला आहे़ शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते आयुष्यभर संघर्ष करत राहिले. त्यांनी शेतकरी, शेतमजुरांबरोबरच सामान्य माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला. शेतकर्यांनी आधुनिकतेची कास धरावी यासाठी ते आग्रही होते. शासनाने शेतमालाला योग्य दर द्यावा हा आग्रह धरताना संसदेतही त्यांनी शेतकर्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. - गिरीश बापट, पालकमंत्री