शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
2
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
3
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
4
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
5
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
6
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
7
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
8
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
9
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
10
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
11
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
12
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
13
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
14
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
15
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
16
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
17
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
18
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
19
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
20
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला

शाही इमाम बुखारींचे शरीफ यांना निमंत्रण तर मोदींना 'नो एंट्री'

By admin | Updated: October 30, 2014 15:30 IST

जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मुलाच्या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रीत केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलेले नाही.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३० - दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी त्यांच्या मुलाच्या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रीत केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलेले नाही. विशेष बाब म्हणजे बुखारींनी याच कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, डॉ. हर्षवर्धन, भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसैन आणि राज्यसभा खासदार विजय गोयल यांना निमंत्रीत केले आहे. 
शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी त्यांचे १९ वर्षाचे पुत्र शाबान बुखारी यांना वारसदार म्हणून जाहीर केले आहे. २२ नोव्हेंबर रोजी शाबान बुखारी यांची नायब शाही इमामपदी नेमणूक करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी बुखारी यांच्या निमंत्रितांच्या यादीमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा समावेश आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. याविषयी बुखारी म्हणाले, मोदी मुसलमानांचे प्रतिक वापरत नाही. त्यांच्या या भूमिकेमुळेच मुसलमान त्यांच्याशी जुळू शकले नाही. मुसलमानांचा विश्वास संपादन करण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नवाझ शरीफ हे व्यस्त असल्याने त्यांच्याऐवजी भारतातील पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासीत या कार्यक्रमाला येतील अशी माहिती सूत्रांनी दिली. 
जामा मशिदीतील इमाम हे पद गेल्या ४०० वर्षांपासून बुखारी घराण्याकडे आहे. त्यामुळे शाबान बुखारी यांच्या नायब इमाम पदावरील नियुक्ती ही महत्त्वाची मानली जाते. या कार्यक्रमासाठी २२ नोव्हेंबर आणि २५ नोव्हेंबर रोजी विशेष पाहुणे आणि दिल्लीकरांसाठी डिनर असेल. तसेच २९ नोव्हेंबर रोजी विविध देशांचे राजनैतिक अधिकारी आणि दिग्गज व्यक्तींसाठी विशेष कार्यक्रम असेल. या कार्यक्रमासाठी जगभऱातून सुमारे एक हजार धार्मिक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.  सोनिया गांधी, राहुल गांधी, अभिषेक मनु सिंघवी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचादेखील पाहुण्यांच्या यादीत समावेश आहे.