शाहूवाडीत वकिलांचा महालोक अदालतीवर बहिष्कार
By admin | Updated: December 14, 2014 00:45 IST
मलकापूर : उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी शाहूवाडी-मलकापूर न्यायालयाच्या वकिलांनी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला, तर शासनाच्या महालोक अदालतीवर बहिष्कार टाकून न्यायालयासमोर आंदोलन करण्यात आले.
शाहूवाडीत वकिलांचा महालोक अदालतीवर बहिष्कार
मलकापूर : उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी शाहूवाडी-मलकापूर न्यायालयाच्या वकिलांनी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला, तर शासनाच्या महालोक अदालतीवर बहिष्कार टाकून न्यायालयासमोर आंदोलन करण्यात आले.गेले वर्षभर या मागणीसाठी वकिलांनी आंदोलन करून आपल्या मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत. मात्र, अद्याप शासनाने मागणीला हिरवा कंदील दाखविलेला नाही. गेले दोन दिवस शाहूवाडी-मलकापूर न्यायालयाच्या वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. दोन दिवस न्यायालयाचे कामकाज ठप्प आहे. शासनाच्या महालोक अदालतीवर वकिलांनी बहिष्कार टाकला आहे. न्यायालयासमोर आंदोलन करून घोषणा देण्यात आल्या.आंदोलनात बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड़ एस. डी. पाटील, उपाध्यक्ष ॲड़ ए. एस. चौगुले, सचिव ॲड़ वाय. ए. शेळके, ॲड़ विक्रम बांबवडेकर, ॲड़ जे. एस. काकडे, एम. के. साळुंखे, व्ही. बी. सिंघण, ॲड़ अर्चना पवार-हळदकर, आर. व्ही. नागवेकर, बापू कांबळे, आदी वकिलांसह प्रमुख पदाधिकारी सामील झाले होते.(प्रतिनिधी) फोटो - शाहूवाडी-मलकापूर न्यायालयासमोर वकिलांनी आंदोलन केले.