शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वेतन आयोगाचा सात लाख फरक अधिकार्‍यांनी उचलला वेतन कपातीची शिफारस : भोर,खरात यांचाही समावेश

By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST

जळगाव : आर्थिक व्यवहार हाती असल्याने कर्मचार्‍यांच्या पगारातून ७५ टक्के कपातीची शिफारश करणार्‍या अधिकार्‍यांनी मात्र सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी ७ कोटी ३५ लाखांची उचल केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.

जळगाव : आर्थिक व्यवहार हाती असल्याने कर्मचार्‍यांच्या पगारातून ७५ टक्के कपातीची शिफारश करणार्‍या अधिकार्‍यांनी मात्र सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी ७ कोटी ३५ लाखांची उचल केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.
बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मनपा कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाचा फरक देणे टाळण्यासाठी मनपातील अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांच्या वेतनात ७५ टक्के कपात करण्याची शिफारस केली आहे. याचे पडसाद मनपाच्या स्थायी समिती सभेत उमटले. कर्मचार्‍यांनीही याप्रश्नी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला. या प्रकाराची स्थायी सभेत सदस्यांनी गंभीर दखल घेऊन अधिकार्‍यांना धारेवर धरले असता तशी माहिती वृत्तपत्रांना दिली नसल्याचे सांगून व प्रस्ताव नसल्याचे सांगत सभागृहाचीदेखील दिशाभूल केल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकाराची गंभीर पडसाद सभागृह तसेच मनपा कर्मचारी वर्गाकडून उमटत असताना उपमहापौर ललित कोल्हे यांनी याप्रश्नी नाराजी व्यक्त करत कर्मचार्‍यांचे पगार कपातीचे शिफारस करणार्‍या या अधिकार्‍यांनी कशी उचल केली याचे बिंग फोडले आहे.
यांनी केली उचल
कपातीची शिफारस करणारे मुख्य लेखापरीक्षक सुभाष भोर यांनी मनपातून सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी ३८ हजार ९२४ रूपयांची उचल केली आहे. तसेच मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत खरात यांनी ३३ हजार ३ रुपये उचल केली आहे. २०१३ पासून विविध पदावरील अधिकार्‍यांनी उचल केलेल्या रकमा पुढील प्रमाणे आहेत. आयुक्त प्रकाश बोखड - ३७, ३३९, उपायुक्त आर.आर. काळे - १, ७८, ७०५, सहा. संचालक नगररचनाकार एन.एस. आढारी- १, ०४, ३९१, उपायुक्त भालचंद्र बेहेरे- ७४, ७५०, मुख्य लेखापरीक्षक प्रवीण पंडित- ३३,२६०, मुख्य लेखापरीक्षक वाय.जे. ठाकूर- ३८,९२४, मुख्य लेखाधिकारी सुरेश सोळसे - ३३, ३७६, सहा. आयुक्त अविनाश गांगोडे- ४२, १२७, शहर अभियंता गजमल ठाकरे- ७७, २६८, शहर अभियंता सी.जी. पाटील - ४३, ९२६ या प्रमाणे रकमा उचलण्यात आल्या आहेत.
प्रकार आयोग्य
कर्मचार्‍यांच्या पगारातून कपात करण्यांची भाषा करून स्वत: मात्र मनपाच्या अडचणींचा विचार न करता पैसा उचलून घेण्याचा हा प्रकार योग्य नसून कपातीची भाषा यापुढे करू नये अशी भूमिका ललित कोल्हे व बंटी जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.