शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सीव्हीसी, सीआयसीच्या नावांवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: June 2, 2015 01:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समितीने सोमवारी मुख्य दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि केंद्रीय माहिती आयुक्तांसह (सीआयसी) अन्य महत्त्वाच्या पदांच्या

नबीन सिन्हा, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समितीने सोमवारी मुख्य दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि केंद्रीय माहिती आयुक्तांसह (सीआयसी) अन्य महत्त्वाच्या पदांच्या नावांची राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे शिफारस करीत या रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग प्रशस्त केला आहे.सीव्हीसी आणि सीआयसी ही दोन्ही पदे बऱ्याच काळापासून रिक्त होती. नावांवर मंजुरीची मोहोर उमटविण्यासाठी सोमवारी दुसरी बैठक झाली. अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे बैठकीला उपस्थित होते. एका दक्षता आयुक्ताच्या नावाचीही शिफारस करण्यात आल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.राष्ट्रपतींकडे नावांची शिफारस करण्यात आली असून योग्य वेळी ती जाहीर केली जाईल. नावांची निवड एकमताने करण्यात आली, अशी माहिती खरगे यांनी दिली. प्रदीप कुमार निवृत्त झाल्यानंतर सीव्हीसीचे पद २८ सप्टेंबरपासून रिक्त होते. माथूर, सौरव चंद्र, सरकार यांची नावे अग्रस्थानीसीव्हीसी पदासाठी माजी संरक्षण सचिव आर.के. माथूर यांच्यासह सीबीडीटीचे माजी अध्यक्ष के.व्ही. चौधरी यांचे नाव अग्रस्थानी आहे. माथूर हे १९७७ च्या मणिपूर-त्रिपुरा बॅचचे अधिकारी आहेत. समितीने सीआयसी आणि सात माहिती आयुक्तांच्या नावावरही चर्चा केली. सीआयसीच्या पदांसाठी २०० अर्ज आले. माहिती आयुक्त पदांसाठी आलेल्या अर्जांची संख्या ५५० होती. सर्वात ज्येष्ठ माहिती आयुक्त विजय शर्मा यांची नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.