शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

फुटीरवाद्यांच्या मिरवणुकीत पाकी ध्वज!

By admin | Updated: April 16, 2015 09:38 IST

गेल्या महिन्यातच कारागृहातून मुक्त झालेला फुटीरवादी नेता मसरत आलम याच्यासह गिलानींच्या अनेक समर्थकांनी हातात पाकिस्तानी ध्वज घेऊन पाकिस्तानच्या समर्थनात प्रचंड नारेबाजी केली.

गिलानीची जाहीर सभा : काश्मीरमध्ये तणावश्रीनगर : हुरियत कॉन्फरन्सच्या कट्टरपंथी गटाचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी बुधवारी येथे घेतलेल्या जाहीर सभेत गेल्या महिन्यातच कारागृहातून मुक्त झालेला फुटीरवादी नेता मसरत आलम याच्यासह गिलानींच्या अनेक समर्थकांनी हातात पाकिस्तानी ध्वज घेऊन पाकिस्तानच्या समर्थनात प्रचंड नारेबाजी केली. त्यातून काश्मीरमधील तणावात कमालीची भर पडली.जम्मू-काश्मीर सरकारने तब्बल पाच वर्षांनी गिलानीस जाहीर सभेची परवानगी दिली होती. दिल्लीतील तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर बुधवारी गिलानीचे श्रीनगरात आगमन झाले त्यावेळी विमानतळावरून त्याच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे नेतृत्व बेकायदेशीर कारवाया नियंत्रण कायद्याखाली गुन्हा दाखल असलेल्या मसरत आलमने केले. त्याला पुन्हा अटक होण्याची शक्यता असल्याचे एका अधिकृत सूत्राने सांगितले. राज्यात पीडीपी-भाजपा युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्याच महिन्यात आलमची सुटका करण्यात आली. त्यावरून केंद्र आणि राज्यात तसेच सत्ताधारी आघाडीतही संघर्षाची ठिणगी पडली होती. बुधवारीही भाजपाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून कायदे मोडणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची सूचना राज्य सरकारला देण्याची मागणी केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांच्याकडे केली. तर काँग्रेसने भाजपाची फिरकी घेत विकासाची एवढीच चिंता असेल तर सरकारमधून बाहेर पडा,असे आव्हान दिले. काश्मिरात २०१० साली शंभराहून अधिक बळी घेणाऱ्या हिंसक आंदोलनात मसरतचा हात होता. त्या आंदोलनानंतरची गिलानीची ही पहिलीच सभा होती. काश्मीर हा केवळ भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा सीमावाद नसून राज्यातील एक कोटी लोकांच्या भावनेचा प्रश्न असल्याचे त्याने यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)