शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

८५ विमानांचा संपर्क तुटल्यामुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 01:02 IST

येथील सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाचा (एअर ट्रॅफिक कंट्रोल-एटीसी)विमानांशी असलेला संपर्क तुटल्याने हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

कोलकाता : येथील सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाचा (एअर ट्रॅफिक कंट्रोल-एटीसी)विमानांशी असलेला संपर्क तुटल्याने हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. पण सुदैवाने त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.हा प्रकार गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. अवघ्या १0 मिनिटांसाठीच हे घडले असले तरी त्यामुळे ८५ विमानांशी एटीसीचा संपर्क होत नव्हता. तेथून उड्डाण घेतलेली विमाने आणि तिथे येणारी विमाने त्यामुळे संपर्काशिवाय होती. त्यांना एटीसीकडून कोणत्याही सूचना मिळू शकत नव्हत्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब होती. येणारी आणि जाणारी विमाने यांचे नेमके ठिकाण दाखवणारा एटीसीमधील डिस्प्ले बंद पडल्याने हा प्रकार घडला. त्यावेळी कोलकाता विमानतळाच्या नियंत्रण क्षेत्रात ८५ विमाने आकाशात होती.केंद्र सरकारने आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने या प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून, याप्रकरणी अहवाल मागवला आहे. विमानांच्या वाहतुकीची माहिती देणारी यंत्रणा बंद पडल्याने प्रोटोकॉलप्रमाणे हाय फ्रिक्वेन्सीद्वारे विमानांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ती यंत्रणाही बंद पडल्याचं लक्षात आले. कोलकाता विमानतळावरील बीएसएनएल नेटवर्कबंद पडल्याने ही समस्या निर्माण झाली, असे सूत्रांनी सांगितले. इंटरनेट प्रोटोकॉलच्या माध्यमातून वापरण्यात येणाऱ्या या लाईनद्वारे वैमानिकांशी संपर्कसाधून त्यांना इतर विमानांची माहिती दिली जाते. तसेच विमानांमधील सुरक्षित अंतर किती आहे, याचे संदेश दिले जातात. (वृत्तसंस्था)