आरोपींच्या अटकेसाठी आत्मदहनाचा इशारा
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
अकोले : घरगुती वादातून माय-लेकीस मारहाण करणार्या आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी युवतीने पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला.
आरोपींच्या अटकेसाठी आत्मदहनाचा इशारा
अकोले : घरगुती वादातून माय-लेकीस मारहाण करणार्या आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी युवतीने पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला.याबाबतची माहिती अशी की घर बांधणीच्या वादावरुन शहरालगत कारखाना रोड परिसरात नाईकवाडी व शेटे कुटुंबात वाद असून याचे रुपांतर हाणामारीत झाले. नंतर परस्परांविरुध्द पोलिसांत गुन्हे दाखल झाले. यात बादशहा काशिनाथ शेटे याच्यासह सातजणांनी मला व माझ्या आईस जखमी केले. यात पोलिसांनी माझे वडील आणि भावास तात्काळ अटक केली. परंतु शेटे कुटुंबातील कुणालाच अटक केली नाही, असा दावा करत उज्वला नाईकवाडी हिने शनिवारी पोलीस ठाण्यात गांधीगिरी केली व आरोपींना सोमवारपर्यंत अटक न झाल्यास पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी) ------------घरगुती वादातून शेटे व नाईकवाडी कुटुंबांवर परस्परविरोधी फिर्यादीवरुन दखलपात्र गुन्हे दाखल झाले. कायदेशीर कारवाई करत वेळेत दोन्ही बाजूच्या आरोपींना अटक केली. कामात हयगय केली नाही. कुणाच्यातरी इशार्यावर पोलीस स्टेशनची बदनामी करण्याचा कुटील डाव रचला जात आहे.- एम. बी. पाटील, पोलीस निरीक्षक