शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगार सोसायट्यांवर बंदची टांगती तलवार अधिकार्‍यांच्या उदासिनतेचा फटका : बेरोजगार तरुणांवर कोसळणार आर्थिक संकट

By admin | Updated: January 6, 2016 23:00 IST

(ग्रामीण व सेंट्रल डेस्कसाठी/हॅलोवर घेतली आहे)

(ग्रामीण व सेंट्रल डेस्कसाठी/हॅलोवर घेतली आहे)
जळगाव: सर्वच बेरोजगारांना नोकर्‍यांमध्ये संधी मिळणे शक्य नसल्याने आघाडी सरकारने बेरोजगार तरुणांना रोजगाराचे साध मिळावे यासाठी प्रत्येक जिल्‘ात स्वयंरोजगार सोसायट्यांची स्थापना केली, मात्र अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे या संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या, परिणामी ३० टक्के संस्थाने लेखापरीक्षण झाले नाही, तोच धागा पकडून आता सरकारने या संस्था बंद करण्याचा घाट घातला आहे.
सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळावे व उद्देशाने शासनाने स्वयंरोजगार सोसायटींना चालना दिली. तत्कालीन स्वयंरोजगार मंत्री नितीन राऊत व राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी या संस्थांना एक लाखावरुन पाच लाखापर्यंत कामे देण्याचा निर्णय घेतला. तालुका निबंधकांकडे २००३ च्या सहकार कायद्यांतर्गत संपूर्ण राज्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी अकरा सदस्यांचा गट करुन या संस्था स्थापन केल्या.शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांची कामे घेऊन त्यातून रोजगाराचे साधन निर्माण केले. त्यानंतर राज्यस्तरावर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फेडरेशनची निर्मिती झाली.
जिल्‘ात १२० संस्था
जिल्‘ात १२० संस्थांची नोंदणी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात या संस्थाना अपवादात्मक कामे मिळाली. आता मात्र कामेही बंद झाली आहेत. तसेच संस्थेच्या सभासदांना शासनाकडून ना परतावा मिळणारे दोन हजार रुपयांची मदतही सरकारने बंद केली. परिणामी ३० टक्के संस्थांचे लेखापरीक्षणच झाले नाही.

सरकारकडे पाठपुरावा
बेरोजगारांच्या या संस्था बंद करण्याचीऐवजी त्यांना संजीवनी मिळावी यासाठी जळगाव जिल्हा सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष वाल्मीक पाटील यांनी सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही याबाबतीच साकडे घालण्यात आले आहे, परंतु अजून कुठलाच निर्णय झालेला नाही. येत्या ९ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कोट..
या संस्थांकडे सरकारने व्यवहार म्हणून न पाहता सहानुभूतीने पहावे. संस्थांना उर्जितावस्था प्राप्त करुन दिल्यास हजारो बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल
-वाल्मीक पाटील, अध्यक्ष, जिल्हा सोसायटी फेडरेशन