संघाशी संबंधित शाखेचा दावा : 40 हजार लोक परत हिंदू
आग्रा : ‘घर वापसी’ मोहिमेअंतर्गत 20 जिलतील 2000 मुस्लिमांसह एकूण 40,000 लोकांना धर्मातर करून परत हिंदू धर्मात आणण्यात आल्याचा दावा आर्य समाजचा क्षेत्र प्रमुख राजेश्वर सिंग याने प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रत केला आहे. 2014 र्पयत एक लाख लोकांचे धर्मातर करण्याचे लक्ष्य असल्याचेही या पत्रत म्हटले आहे.
ख्रिश्चनांच्या धर्मातरासाठी दोन लाख रुपये आणि मुस्लिमांच्या धर्मातरासाठी पाच लाख रुपयांचा खर्च येतो. धर्मातराचा हा खर्च भागविण्यासाठी लोकांनी देणगी द्यावी, असे आवाहन या पत्रत केले आहे. दरम्यान या पत्रत दिलेल्या मोबाईल फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण हा फोन बंद ठेवण्यात आला आहे.
दंगलग्रस्त मुजफ्फरनगरसह पश्चिम उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये असे धर्मातराचे कार्यक्रम आयोजित करण्याची आर्य समाज या रा. स्व. संघाची शाखा असलेल्या संघटनेची योजना आहे, असे संघाच्या एका पदाधिका:याने सांगितले. अशाप्रकारचे धर्मातराचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील. असे कार्यक्रम आधीपासूनच आयोजित केले जात आहेत. परंतु मीडियाने आता त्याला अनावश्यक प्रसिद्ध दिली आहे. त्यामुळे आता असे कार्यक्रम गुप्तरीत्या घेण्याची आमची योजना आहे, असे संघाच्या या पदाधिका-याने सांगितले.
दरम्यान आग्रा न्यायालयाने किशोर वाल्मिकी या मुख्य आरोपीविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे. आग्रा येथे गरीब मुस्लिमांचे जबरदस्तीने धर्मातर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अन्य धर्मीयांचे धर्मातर हा सांप्रदायिक कार्यक्रम आहे की विकास कार्यक्रम हे मोदी सरकारने सांगावे, असे आवाहन ऐशबाग ईदगाहचे मौलाना खालीद राशीद फरंगी महाली यांनी केले आहे.
बुधवारी राज्यसभेत होणार चर्चा..
- नवी दिल्ली-बळजबरीने केल्या जाणा:या धर्मातराच्या मुद्यावर येत्या बुधवारी राज्यसभेत चर्चा होणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.
- विरोधी पक्ष सदस्यांनी आग्रा येथे व अलीगडमध्ये बळजबरीने करण्यात आलेल्या धर्मातराचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी या मुद्यावर 17 डिसेंबर रोजी चर्चा होणार असल्याचे सांगितले.
भाजपा अध्यक्षांची कठोर कायद्याची शिफारस
- नवी दिल्ली-आग-यात हिंदुत्ववादी संघटनांनी बळजबरीने केलेल्या धर्मातरणाच्या वादादरम्यान भाजपाचे प्रमुख अमित शहा यांनी बळजबरीने केले जाणारे धर्मातर रोखण्यासाठी कठोर कायद्याची शिफारस केली.
(वृत्तसंस्था)