शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या नव्या अध्यक्षाचा शोध सुरू

By admin | Updated: November 13, 2015 00:56 IST

पुढच्या दोन कार्यकाळासाठी अमित शहा हेच भाजपा अध्यक्ष म्हणून कायम राहतील, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी अगदी ठामपणे सांगितले असले तरी येत्या जानेवारीमध्ये नवा पक्षाध्यक्ष निवडण्याच्या

हरीश गुप्ता, नवी दिल्लीपुढच्या दोन कार्यकाळासाठी अमित शहा हेच भाजपा अध्यक्ष म्हणून कायम राहतील, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी अगदी ठामपणे सांगितले असले तरी येत्या डिसेंबर-जानेवारीमध्ये नवा पक्षाध्यक्ष निवडण्याच्या दिशेने शोध प्रारंभ झाला आहे. अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने गेल्या जानेवारीत पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मानहानीजनक पराभवापासून कोणताही धडा घेतला नसल्याकारणाने आता ‘मोठी सुधारणा’ करणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्याचे संघातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतून प्रस्थान करण्याआधी, बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेले अपयश आणि विरोधकांना भाजपाविरुद्ध एकजूट करण्याची संधी निर्माण करून दिल्याबद्दल अमित शहा यांना चांगलेच फटकारल्याची माहिती आहे. राजनाथसिंग यांनी बुधवारी भागवतांची प्रदीर्घ भेट घेतल्यानंतर पक्षाचा अध्यक्ष बदलला जाण्याची शक्यता नाकारली असली तरी, आपण पुन्हा पक्ष संघटनेत परत येऊ इच्छितो, असे राजनाथसिंग यांनी सरसंघचालकांना अगदी प्रांजळपणे सांगितल्याची माहिती त्यांच्या विश्वासातील सूत्रांकडून मिळाली आहे.अमित शहा यांची डिसेंबर-जानेवारीत पूर्ण तीन वर्षांसाठी पक्षाध्यक्ष म्हणून फेरनिवड केली जाईल, असे राजनाथसिंग यांनी निक्षून सांगितले असले तरी शहा यांनी पक्षाध्यक्ष राहावे, असे संघ परिवारात कुणालाही वाटत नाही. भाजपाने लोकसभेच्या २८२ जागा जिंकल्या त्यावेळी राजनाथसिंग हे पक्षाध्यक्ष होते आणि पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याची त्यांची इच्छा होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना गृहमंत्री म्हणून केंद्रात आणले आणि उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागा जिंकून दिल्याबद्दल बक्षीस म्हणून शहा यांच्याकडे पक्षाध्यक्षपद सोपविले.रा.स्व.संघालाही मोदींच्या या निर्णयापुढे झुकावे लागले. त्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये भाजपाला प्रचंड यश मिळाले. परंतु या तिन्ही राज्यांत विरोधी पक्ष विभाजित असल्यानेच भाजपाला यश मिळाले, हे नाकारता येणार नाही.भाजपा अध्यक्षपदाचा संभाव्य उमेदवार म्हणून भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव आघाडीवर असल्याचे या सूत्रांनी सांगितले. गडकरी हे २०१२ मध्ये पक्षाध्यक्ष होते. परंतु त्यांच्या पूर्ती कारखान्यावर आयकर खात्याचा छापा पडल्यानंतर त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते. त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून राजनाथसिंग यांना नियुक्त करण्यात आले होते. कालांतराने तो छापा नव्हताच, हे स्पष्ट झाले असले तरी जे नुकसान व्हायचे होते ते झालेच.रा.स्व.संघालाही मोदींच्या या निर्णयापुढे झुकावे लागले. त्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये भाजपाला प्रचंड यश मिळाले. परंतु या तिन्ही राज्यांत विरोधी पक्ष विभाजित असल्यानेच भाजपाला यश मिळाले, हे नाकारता येणार नाही.भाजपा अध्यक्षपदाचा संभाव्य उमेदवार म्हणून भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव आघाडीवर असल्याचे या सूत्रांनी सांगितले. गडकरी हे २०१२ मध्ये पक्षाध्यक्ष होते. परंतु त्यांच्या पूर्ती कारखान्यावर आयकर खात्याचा छापा पडल्यानंतर त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते. त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून राजनाथसिंग यांना नियुक्त करण्यात आले होते. कालांतराने तो छापा नव्हताच, हे स्पष्ट झाले असले तरी जे नुकसान व्हायचे होते ते झालेच.