सिन्नर : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात जुनी शाळा (क्रमांक तीन) इमारतीला आग लागून पुस्तकांसह शैक्षणिक साहित्य खाक झाले.पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे कार्यालय सध्या जुनी शाळा क्रमांक तीनमध्ये आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारात व्यसनाधीन गांजा, विड्या, दारू पिणार्या लोकांचा वावर असतो. त्यातूनच ही दुर्घटना घडली असावी. या शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाची ट्रकभर पुस्तक आली होती. या आगीत ही पुस्तक खाक झाली असावी. तसेच अन्य शैक्षणिक साहित्य व लाकडी कपाटे जळाली रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)
शाळेला आग लागून शैक्षणिक साहित्य खाक
By admin | Updated: May 18, 2014 00:10 IST