शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

म्हणतात, पत्नीला गायब करा..!

By admin | Updated: July 16, 2016 02:46 IST

जादूच्या खेळाने चरितार्थ चालविणे सोपे नाही हे लोकांना समजावून सांगणे हे आपल्या व्यावसायिक जीवनासमोरील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे प्रसिद्ध जादूगार करणसिंग यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : जादूच्या खेळाने चरितार्थ चालविणे सोपे नाही हे लोकांना समजावून सांगणे हे आपल्या व्यावसायिक जीवनासमोरील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे प्रसिद्ध जादूगार करणसिंग यांनी म्हटले आहे. जादूने काल्पनिक जगताची सैर घडविणारा हा नव्या दमाचा जादूगार म्हणाला की, मी जे करतो ते सामान्य नाही. मी चरितार्थासाठी जादूचे खेळ करतो हे लोकांना समजावून सांगणे सोपे नाही; मात्र, हळूहळू लोकांची धारणा बदलत आहे. त्यांचा जादूतील रस आता वाढू लागला आहे. मी जादूगार असल्याचे पुरुषांना कळताच ते माझ्याकडे विचित्र आग्रह धरतात. आपल्या पत्नीला बेपत्ता करावे अशी त्यांची विनंती असते; परंतु मी त्या प्रकारची जादू करीत नाही. मी लोकांना बेपत्ता करीत नाही. जादूगार म्हटले की, तुम्हाला डोक्यावर मोठी गोल टोपी घातलेली आणि त्यातून जिवंत ससा बाहेर काढणारी व्यक्ती आठवेल; मात्र मी त्या प्रकारचा जादूगार नाही. मी माझ्या प्रेक्षकांप्रमाणेच सामान्य कपडे घालतो आणि कोणत्याही साधनांचा वापर न करता लोकांना आपली कला दाखवू शकतो. मी देशभरात १००हून अधिक शो केले असून, आंतरराष्ट्रीय जादूगार डॅरेन ब्राऊन आणि पेन एंड टेलर यांच्यासोबत काम केले आहे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)