सहरसा : बिहारच्या सहरसा जिल्ह्णात ६५ वर्षीय दहवादेवी ही महिला पतीच्या चितेवर उडी घेत सती गेल्याने खळबळ उडाली आहे. परमिनिया या गावी ही घटना घडली. दहवादेवी हिचे पती चरित्र यादव (७०) यांचा शनिवारी कॅन्सरने मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, तेव्हा दहवादेवी अंत्यसंस्कारात सहभागी नव्हत्या. नंतर दहवादेवी यांना चितेकडे जाताना काहींनी पाहिले. मात्र तोपर्यंत दहवादेवीने चितेच्या स्वाधीन केले होते. (वृत्तसंस्था)
बिहारमध्ये सती
By admin | Updated: December 15, 2014 04:14 IST