संजय दत्तला पुन्हा रजा मंजुर * मुलीवर उपचार : विभागीय आयुक्तांनी केला अर्ज मंजूर
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
पुणे : मुंबई बॉम्ब स्फोट खटल्यात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्त याला विभागीय आयुक्तांनी ३० दिवसांची संजीत रजा मंजूर केली आहे. मुलीच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्यासाठी रजेचा अर्ज त्याने जुनमध्ये विभागीय आयुक्तांकडे केला होता. रजा मंजुर होताच गुरुवारी दुपारी अडीचच्या दरम्यान त्याला कारागृहामधून सोडण्यात आल्याची माहिती अधीक्षक यु. टी. पवार यांनी दिली.
संजय दत्तला पुन्हा रजा मंजुर * मुलीवर उपचार : विभागीय आयुक्तांनी केला अर्ज मंजूर
पुणे : मुंबई बॉम्ब स्फोट खटल्यात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्त याला विभागीय आयुक्तांनी ३० दिवसांची संजीत रजा मंजूर केली आहे. मुलीच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्यासाठी रजेचा अर्ज त्याने जुनमध्ये विभागीय आयुक्तांकडे केला होता. रजा मंजुर होताच गुरुवारी दुपारी अडीचच्या दरम्यान त्याला कारागृहामधून सोडण्यात आल्याची माहिती अधीक्षक यु. टी. पवार यांनी दिली.संजय दत्त याने केलेल्या अर्जावर विभागीय आयुक्त चोक्कलिंगम दोन दिवसांपुर्वी निर्णय घेत रजा मंजूर केली. मंजूर करण्यात आलेली ही संचित रजा ६० दिवसांपर्यंत वाढवता येऊ शकते. मुंबई बॉम्ब स्फोट खटल्यात शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मे २०१३ मध्ये त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्याने आतापर्यंत एकूण १४६ दिवसांची रजा भोगलेली आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये त्याला फर्लो मंजूर करण्यात आली होती. ती पुढे १४ दिवस वाढवूनही देण्यात आली होती. यासोबतच जानेवारी २०१४ मध्ये त्याला ३० दिवसांची संचित रजा मंजूर झाली. ही रजाही ६० दिवसांपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये पुन्हा १४ दिवसांची फर्लो मंजूर करण्यात आली होती. त्याने ही रजा वाढवून मिळण्यासाठी शासनदरबारी खुप प्रयत्न केले. परंतु माध्यमांनी टिकेची झोड उठवल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात हजर व्हावे लागले होते. काही दिवसांपुर्वीच त्याने आत्याच्या अंत्यविधीसाठी जाण्याची परवानगी कारागृह प्रशासनाकडे मागितली होती. परंतु प्रशासनाने त्याला परवानगी नाकारल्यानंतर संजय दत्तने कारागृहात उपोषण सुरु केल्याची अफवा पसरली होती. त्यावर कारागृह प्रशासनाला खुलासा करावा लागला होता. कधी पत्नी मान्यता दत्त तर कधी मुलीच्या उपचारांचे कारण देऊन संजय दत्त रजा मंजूर करुन घेत असल्यामुळे कारागृह प्रशासन संजय दत्तला झुकते माप देत असल्याची टीका होत आहे. संजय दत्त कारागृहात सध्या कापडी पिशव्या बनवण्याचे काम करीत आहे. गुरुवारी त्याच्याकडून कागदपत्रांची पुर्तता करण्यात आल्यानंतर दुपारी साधारण दोन ते अडीचच्या दरम्यान त्याला बाहेर सोडण्यात आल्याचे अधीक्षक पवार यांनी सांगितले.