शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

संघ कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश नाकारला- राहुल

By admin | Updated: December 15, 2015 03:03 IST

अलीकडेच आसाममधील दौऱ्यात मी बारपेटा येथील मंदिरात प्रवेश करीत असताना रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी मला रोखले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी

नवी दिल्ली : अलीकडेच आसाममधील दौऱ्यात मी बारपेटा येथील मंदिरात प्रवेश करीत असताना रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी मला रोखले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपची ही राजकारणाची पद्धत स्वीकारार्ह नसल्याचेही ते म्हणाले. दुसरीकडे वैष्णव मठाचे प्रमुख (सत्र प्रमुख) वशिष्ठदेव शर्मा यांनी राहुल गांधी यांना कुणीही प्रवेश नाकारला नसल्याचे सांगतानाच हा आरोप दुर्दैवी असल्याचे स्पष्ट केले.सोमवारी पंजाबमधील कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी संसदेबाहेर काँग्रेसने निदर्शने केली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, मला तीन मुद्दे उपस्थित करायचे आहेत. मंगळवारी कोलाम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाला केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. हा त्या राज्यांतील जनतेचा अपमान आहे. मी जेव्हा आसाममध्ये गेलो त्यावेळी बारपेटा जिल्ह्णातील एका मंदिरात जात होतो त्यावेळी संघाच्या लोकांनी मला प्रवेश करू दिला नाही. माझ्यासमोर एका महिलेला उभे करण्यात आले आणि मला मंदिरात प्रवेश करता येणार नाही, असे सांगण्यात आले. मला रोखणारे हे लोक कोण आहेत? असा सवालही त्यांनी केला. शुक्रवारी ते बारपेटा येथे गेले होते. ते संध्याकाळी पुन्हा त्या मंदिरात गेले असता संघाचे कार्यकर्ते तेथे नव्हते. भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना बारपेटा येथील मंदिरात प्रवेश नाकारल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगई यांनी रविवारी केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)