शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतरावर संघ ठाम!

By admin | Updated: December 21, 2014 02:39 IST

‘घर वापसी’ कार्यक्रमांचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी येथे समर्थन केले आणि धर्मांतर व्हायला नको असेल तर धर्मांतरबंदी कायदा करावा, असे आग्रही प्रतिपादन केले.

‘घर वापसी’ सुरूच ठेवू : भागवत म्हणतात... पसंत नसेल तर कायदा कराकोलकाता : सक्तीने धर्मांतर केले गेलेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी संघ परिवाराशी संबंधित संस्थांकडून सुरू असलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी येथे समर्थन केले आणि धर्मांतर व्हायला नको असेल तर धर्मांतरबंदी कायदा करावा, असे आग्रही प्रतिपादन केले.येथील शहीद मिनार मैदानावर भरलेल्या, पश्चिम बंगालमधील अशा प्रकारच्या पहिल्याच, ‘विशाल हिंदू संमेलना’त बोलताना भागवत म्हणाले की, धर्मांतर करून हिंदू करून घेणे कोणाला आवडत नसेल तर हिंदूंचेही धर्मांतर होता कामा नये.भागवत म्हणाले, ‘आम्ही सशक्त हिंदू समाज घडवीत आहोत. जे (वाट चुकून) हिंदू धर्मातून बाहेर गेले आहेत ते स्वत:हून गेलेले नाहीत. प्रलोभने दाखवून व सक्तीने त्यांना नेण्यात आले आहे. त्यांना परत यायचे असेल तर आम्ही त्यांना नक्कीच परत आणू. गेलेले लोक आमचेच आहेत. चोराने चोरलेली आमची मौल्यवान वस्तू, चोराला पकडल्यावर, आम्ही त्याच्याकडून परत घेत आहोत. यात नवीन असे काहीच नाही.उत्तर भारतात काही हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांवरून गेला आठवडाभर संसदेत आणि संसदेबाहेर वादळ उठलेले असताना सरसंघचालकांनी या विषयावर प्रथमच जाहीर वक्तव्य केले. टीकाकारांना उद्देशून ते म्हणाले, ‘हे कोणाला आवडत नसेल तर धर्मांतरावर संपूर्ण बंदी घालणारा कायदा करावा. पण तुम्हाला असा कायदा नको आहे. धर्मांतर करून हिंदू होणे तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही हिंदूंचे धर्मांतरही करू नका. ही आमची ठाम भूमिका आहे. (वृत्तसंस्था)अमित शहांना हवा धर्मांतरबंदी कायदाकोची : धर्मांतराच्या मुद्द्यावर संसदेत विरोधकांनी चालवलेली कोंडी आणि त्यामुळे सरकारची मलीन होत असलेली प्रतिमा या पार्श्वभूमीवर, बळजबरीच्या धर्मांतरास भाजपाचा पूर्णपणे विरोध असल्याची स्पष्टोक्ती पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी दिली़ देशात धर्मांतरविरोधी कायद्याची गरज अधोरेखित करतानाच, या कायद्यास स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले़ भागवत उवाच...हिंदूंना उद्देशून भागवत यांचे असे म्हणणे होते की, (तुम्ही) घाबरण्याचे काहीच कारण नाही. आपण आपल्याच देशात राहत आहोत. आपण काही घुसखोर नाही. हा आपला देश आहे, आपले ‘हिंदू राष्ट्र’ आहे. हिंदू आपली (स्वत:ची) भूमी सोडून जाणार नाहीत. भूतकाळात आपण जे गमावले ते आपण परत मिळवू. हिंदूंमधील जागरणाने कोणीही भीती बाळगण्याची गरज नाही. याविरुद्ध ओरड करणारे स्वार्थी आहेत व अशी ओरड करण्यात त्यांचे निहित हित गुंतलेले आहे.कोणावरही जुलूम-जबरदस्ती करण्यावर हिंदूंचा अजिबात विश्वास नाही, असे प्रतिपादन करून भागवत म्हणाले की, बांगलादेश किंवा पाकिस्तानने अत्याचार केले तरी हिंदू निमूटपणे सहन करतात. १०० पापांचा घडा भरला की मग अत्याचारांचा प्र्रतिकार करा, असे हिंदूंचा परमेश्वर सांगतो.मोदी सरकारच्या विकासाचे ‘धर्मांतर’भाजपाने विकासाच्या नावावर निवडणुका जिंकल्या होत्या़ ‘अच्छे दिन आयेंगे’ असे आश्वासन देशाच्या जनतेला दिले होते़ मात्र निवडणूक जिंकल्यानंतर भाजपाप्रणीत रालोआ सरकार गत सहा महिन्यांत ‘लव जिहाद’ आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलत आहे, अशी टीका आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केली़ जे (वाट चुकून) हिंदू धर्मातून बाहेर गेले आहेत ते स्वत:हून गेलेले नाहीत. त्यांना परत यायचे असेल तर आम्ही त्यांना नक्कीच परत आणू. - मोहन भागवत