शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

धाडसाला सलाम...जवानांच्या मोहीमेमुळे लडाखमधील पूरसंकट टळले

By admin | Updated: April 2, 2015 11:03 IST

देशाच्या संरक्षणासोबतच बचाव कार्यातही महत्त्वाची भूमिका निभावणा-या भारतीय जवानांच्या धाडसी मोहीमेमुळे लडाखमधील पुर संकट टळले आहे.

ऑनलाइन लोकमत 
श्रीनगर, दि. २ -  देशाच्या संरक्षणासोबतच बचाव कार्यातही महत्त्वाची भूमिका निभावणा-या भारतीय जवानांच्या धाडसी मोहीमेमुळे लडाखमधील पुर संकट टळले आहे. सैन्याच्या जवानांनी समुद्र सपाटीपासून १३ हजार फूट उंचावर असलेल्या लडाखमधील झंस्कार नदीतील अडथळा स्फोट घडवून दूर केला आहे. सैन्य, हवाई दल व आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी राबवलेल्या या धाडसी मोहीमेचे भारतासोबतच पाकिस्तानमधील वेबसाईट्सवरही कौतुक होत आहे. 
जम्मू काश्मीरमधील लेह लडाख येथे काही महिन्यांपूर्वी झंस्कार नदीच्या खो-यात भूस्खलन झाले होते.  भूस्खलनामुळे झंस्कार नदीचा मार्ग थांबला व झंस्कार खो-यात तब्बल १५ किलोमीटर परिसरात पाणी साठले. थंडीच्या दिवसांत हे पाणी गोठून बर्फाचा तलाव तयार झाला. हा तलाव कधीही फुटण्याची शक्यता होती व यामुळे लडाखमधील नदी किनारच्या गावांना धोका निर्माण झाला असता. या गावांमध्ये पुर येऊन जीवित व वित्तहानी झाली असती. हा संभाव्य धोका ओळखून जम्मू काश्मीर सरकारने या घटनेची माहिती केंद्र सरकारला दिली. केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण, सैन्य व हवाई दलाची उच्चस्तरीय बैठक घेऊन या समस्येवर तोडगा काढण्याची योजना आखली. हवाई दलाच्या माध्यमातून सैन्याच्या जवानांनी स्फोट घडवून हा तलाव फोडण्याची मोहीम हाती घेतली. 
हवाई दलांच्या विमानांच्या तब्बल ३०० हून अधिक तास उड्डाण करत ५०० फे-या मारल्या. सैन्याच्या जवानांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झंस्कार नदीच्या मार्गात आलेला राडा रोडा दूर केला. झंस्कार नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला. यानंतर १७५ किलोहून अधिक स्फोटकांचा वापर करत हा तलाव फोडण्यात आला. अखेरीस झंस्कार नदीचा मार्ग मोकळा झाला आहे. जोरदार वारे, प्रतिकूल परिस्थितीत सैन्याच्या जवानांनी राबवलेली ही मोहीम कौतुकाचा विषय ठरली आहे.