म्हणो, मंदिर उभारून पूजा करणोही गैर : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे वादग्रस्त वक्तव्य
जबलपूर : शिर्डीचे साईबाबा हे देव नाहीत. त्यामुळे त्यांचे मंदिर उभारून पूजा करणो गैर असल्याचे वादग्रस्त वक्तव्य द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी केले.
साईबाबांच्या पूजेला प्रोत्साहन देणारे हिंदू धर्माला कमकुवत करीत आहेत. साईबाबांचे मंदिर उभारून त्यांच्या नावावर कोटय़वधी रुपये कमावले जातात. त्या मंदिरातील दानपेटय़ांत लाखो रुपये पडतात. साईबाबा संस्थानचे उत्पन्न कोटींत आहे. साईबाबा देव नसताना त्यांच्यावर अशाप्रकारे कोटय़वधींचा व्यवहार करण्यास स्वरूपानंद यांचा आक्षेप आहे. साईबाबा हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानले जातात, मात्र स्वरूपानंदांना हेही मान्य नाही. साईबाबांच्या नावावर पैसा कमावला जात आहे, असे त्यांचे म्हणणो आहे. स्वामी स्वरूपानंद यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्यावरून साईबाबांच्या देश-विदेशातील भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. (वृत्तसंस्था)
शंकराचार्य आणि वाद
एका पत्रकाराच्या श्रीमुखात भडकावल्याने शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यापूर्वीही वादात सापडले होते. लोकसभा निवडणूक काळात एका पत्रकाराने त्यांना पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यापैकी तुम्हाला कोण योग्य वाटते, असा प्रश्न विचारला होता. त्यावर ते भडकले आणि संबंधित पत्रकाराला थप्पड मारली होती.