शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला क्रांतिकारकांचा विसर सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

By admin | Updated: November 15, 2015 23:14 IST

पुणे : महाराष्ट्र महापुरुष आणि क्रांतिकारकांची आठवण करण्यात कमी पडत असून राज्याने हा कद्रूपणा सोडायला हवा. देशासाठी प्रेरणा असणार्‍या लोकांचा विसर पडता कामा नये. असे मत संतसाहित्याचे अभ्यासक व ८८ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

पुणे : महाराष्ट्र महापुरुष आणि क्रांतिकारकांची आठवण करण्यात कमी पडत असून राज्याने हा कद्रूपणा सोडायला हवा. देशासाठी प्रेरणा असणार्‍या लोकांचा विसर पडता कामा नये. असे मत संतसाहित्याचे अभ्यासक व ८८ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
क्रांतिकारक हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या बलिदान शताब्दीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री.म.भावे, सु.ह.जोशी व इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे उपस्थित होते.
मोरे पुढे म्हणाले, देशासाठी प्राण दिलेले लोक हे केवळ भूतकाळ नाही तर त्यांच्या कार्याचा गौरव होणे गरजेचे आहे. इतिहासाचे आपल्याकडे जितके चीज व्हायला हवे तितके होत नाही त्यामुळे स्वत:ला देशप्रेमी मानणार्‍या आणि सत्तेत असणार्‍या सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. क्रांतिकारक पिंगळे हे अतिशय पुरोगामी होते म्हणून इतक्या मोठ्या व्यक्तीला दूर सारणे चुकीचे असून ही चूक आपण लवकरात लवकर सुधारायला हवी.
भावे म्हणाले, स्वातंत्र्यासाठी अनेक चळवळी आणि लढाया झाल्या असल्या तरीही स्वातंत्र्यलढ्याला पूरक असेच क्रांतिकारकांचे काम होते. मात्र या गोष्टीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होते. स्वातंत्र्याच्या प्रवाहांचा वेध घेऊन आपल्या राष्ट्रीय चारित्र्याचा अंदाज घ्यायला हवा. त्यासाठी स्वातंत्र्याचे विविध पैलू लक्षात घ्यायला हवेत.
यावेळी सु.ह.जोशी यांनी हुतात्मा विष्णू पिंगळे यांच्या कार्याबाबत देताना आपल्या राज्यात क्रांतीवीरांना स्थान नसल्याबाबत खंत व्यक्त केली. पांडुरंग बलकवडे यांनी प्रास्ताविक केले.