शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

रशियन तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला

By admin | Updated: November 14, 2015 01:20 IST

वाराणसीत पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या एका २३ वर्षीय रशियन तरुणीवर शुक्रवारी सकाळी कथितरीत्या तिच्या प्रियकराने अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना घडली.

वाराणसी : वाराणसीत पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या एका २३ वर्षीय रशियन तरुणीवर शुक्रवारी सकाळी कथितरीत्या तिच्या प्रियकराने अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पीडितेचा चेहरा आणि खांद्याचा भाग गंभीररीत्या पोळला आहे.लंका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदनगर कॉलनीत ही घटना घडली. पीडित तरुणी या भागातील एका घरात गत काही महिन्यांपासून पेइंग गेस्ट म्हणून मुक्कामास होती. यादरम्यान घरमालकाचा मुलगा सिद्धार्थ याच्यासोबत तिची जवळीक निर्माण झाली. सिद्धार्थ हा बनारस हिंदू विद्यापीठात संगीताचा विद्यार्थी आहे. पीडित तरुणीने अलीकडे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सिद्धार्थ नाराज होता. याच मुद्यावर त्यांच्यात वाद झाला आणि संतापाच्या भरात सिद्धार्थने तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला केला. तरुणीचा किंचाळण्याचा आवाज ऐकून सिद्धार्थची आई घटनास्थळी धावली. तिनेच तरुणीला रुग्णालयात भरती केले. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून सिद्धार्थ तूर्तास फरार आहे.