आर.आर. प्रतिक्रिया- भाग २
By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST
राजकारणातला आम आदमी
आर.आर. प्रतिक्रिया- भाग २
राजकारणातला आम आदमीसर्वसामान्य जनतेला आपलासा वाटावा असा हा नेता होता. राजकारणात उच्च पदावर असूनही त्यांची राहणी, त्यांचे बोलणे आम आदमीसारखेच होते. युथ काँग्रेसमध्ये असताना आम्ही सोबत काम केले. व्यक्तिगत संबंध त्यांनी नेहमीच टिकवून ठेवले. एवढ्या कमी वयात आमच्यातून ते निघून गेले. त्यांची कमतरता आयुष्यवर जाणवेल. - अविनाश पांडे, खासदारसामान्य माणसांचा असामान्य नेता हरवलाआबा गेल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. अलीकडच्या काळात राजकारणात राहूनही पारदर्शी राजकारण करणारा राज्याच्या राजकारणात आबा एकमेव होते. आबा सामान्य माणसांचे असामान्य नेता होते. त्यांच्या निधनामुळे अख्खा महाराष्ट्र हळहळला आहे. - गिरीश गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेघरातला माणूस गेलाराज्याच्या राजकारणात सर्वात साधा, नम्र, ज्येष्ठांचा आदर करणारा एकमेव नेता आबा होते. समाजहिताचा कुठलाही निर्णय घेताना ते कधीही डगमगले नाही. तंटामुक्ती, गाडगेबाबा स्वच्छता अभियान यासारख्या योजना राबवून गावागावात शांतता प्रस्थापित केली. कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्रोत असणारे आबा आमच्या घरातलेच होते. त्यांच्या अकस्मात जाण्याने पक्षाचे व कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. - अतुल लोंढे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस