शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतैक्यासाठी धावाधाव

By admin | Updated: November 25, 2015 00:19 IST

विरोधक आणि सत्ताधारी रालोआ यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून जवळजवळ प्रत्येक मुद्यावरच दोन हात सुरू असताना केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मात्र

हरीश गुप्ता, नवी दिल्लीविरोधक आणि सत्ताधारी रालोआ यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून जवळजवळ प्रत्येक मुद्यावरच दोन हात सुरू असताना केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मात्र राष्ट्रीय मतैक्यासाठी ज्येष्ठ विरोधी नेत्यांची दारे ठोठावण्यासाठी भटकंती चालविली आहे. निमित्त आहे पॅरिस येथे ३० नोव्हेंबर रोजी वातावरण बदलावरील शिखर परिषदेबाबत राष्ट्रीय सहमती घडवून आणण्याचे. या परिषदेत भारताची एकमुखी भूमिका मांडली जावी यासाठी जावडेकरांनी प्रयत्न चालविले आहेत. दहा दिवसांच्या पॅरिस भेटीवर जाण्यापूर्वी त्यांनी प्रत्येक मोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून मते जाणून घेण्यावर भर दिला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माकपचे नेते सीताराम येच्युरी, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांच्याशी त्यांनी दीर्घ चर्चा केली. मंगळवारी त्यांनी माजी पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांच्यासोबत अल्पोपहार बैठक घेतली. २७ नोव्हेंबर रोजी पॅरिसला रवाना होण्यापूर्वी ते उर्वरित राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० नोव्हेंबर रोजी या परिषदेला उपस्थित राहातील. जावडेकर ७ डिसेंबरपर्यंत थांबून हा दीर्घ काळापासून प्रलंबित असलेला करार प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करतील.फ्रान्सकडून भारताचे समर्थन...या करारासाठी विकसित देशांनी निधी न पुरविल्यास ही परिषद अपयशी ठरेल, असे सांगत फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्कोईस ओलांद यांनी भारताचे समर्थन केले आहे. पॅरिस परिषद ‘जोडा किंवा तोडा’ अशी ठरणार असून त्यातून काही लाभ मिळविण्यासाठी जावडेकरांनी सर्व पक्षांच्या सहमतीचे अभूतपूर्व पाऊल उचलले आहे. भारताची भूमिका कठोर करण्याला काँग्रेसने समर्थनाचा हात समोर केला असताना डाव्या पक्षांनीही काही सूचना केल्याचे समजते. जावडेकरांनी या परिषदेसंबंधी विस्तृत अहवाल तयार केला आहे. विकसित देशांनी १०.२ अब्ज डॉलर एकमुस्त देण्याचे आश्वासन दिले असताना आतापर्यंत केवळ १६.८ कोटी डॉलर दिले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदी सरकारसाठी पॅरिस परिषद महत्त्वाची ठरणार आहे कारण भारताने अमेरिकेच्या नेतृत्वातील विकसित देशांविरुद्धची भूमिका कठोर केली आहे. जावडेकर यांनी अमेरिकेचे पर्यावरणमंत्री जॉन केरी यांच्याशी संघर्ष चालविला आहे. गेल्या आठवड्यातच या दोघांनी जोरदार प्रत्युत्तर देणारी निवेदने जारी केली. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत पातळीवर विसंवाद उघड होऊ नये ही खबरदारी सरकारला घ्यायची आहे. संपुआ सरकारने टोक्यो परिषदेत मवाळ भूमिका अवलंबल्याने संपुआकडूनही विरोध होऊ शकतो. आता त्या जागी लिमा करार येत आहे. अमेरिका आणि अन्य देशांनी १०० अब्ज अमेरिकन डॉलरचे विधेयक विशिष्ट मुदतीत अमलात आणावे यासाठी आग्रही असल्यामुळे भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार हे निश्चित.वातावरण बदलासंबंधी शिखर परिषद हा काँग्रेस किंवा भाजपचा मुद्दा नाही. आम्हाला आंतरराष्ट्रीय करार प्रत्यक्षात आणायचा आहे. चर्चेतून काय निष्पन्न झाले ते सांगता येणार नाही.- प्रकाश जावडेकर, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री.