शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या जुफाने बनवले गालिचे बनवायचे रोलिंग यंत्र

By admin | Updated: June 20, 2017 01:04 IST

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर शहरात लाल बाजारात राहणाऱ्या जुफा इकबाल (१७) हिने घरात फरशीवरील सजावटीसाठी वापरण्यात येणारे गालिचे तयार करण्याचे रोलिंग मशीन बनवले आहे

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर शहरात लाल बाजारात राहणाऱ्या जुफा इकबाल (१७) हिने घरात फरशीवरील सजावटीसाठी वापरण्यात येणारे गालिचे तयार करण्याचे रोलिंग मशीन बनवले आहे. जुफा म्हणाली की, ‘मी जेव्हा श्रीनगरच्या प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होती त्यावेळी एका कार्यक्रमानिमित्त मला एक प्रकल्प तयार करायचा होता. आम्ही काश्मीर विद्यापीठात गेलो. ते म्हणाले की, अशी वस्तू बनवा की, तिचा लोकांना उपयोग होईल. त्यानंतर मी दूरचित्रवाणी वाहिनीवर या उद्योगाशी संबंधित माहितीपट बघत होते व नंतर मी हे यंत्र बनवण्याचे काम सुरू केले.ती म्हणाली की, हे काम मी सुरू केले त्यावेळी मला ते कसे बनवायचे हे माहीत नव्हते. सगळ्यात आधी मी ते कार्डबोर्डवर बनवले. मग मी जे लोक नमदा (गालिचा) बनवायचे त्यांच्याकडे गेले व ते व्यवस्थित समजून घेऊन काम सुरू केले. हाताने नमदा बनवायला जवळपास पाच तास लागतात.’ जुफाने म्हटले की, तिने जे यंत्र बनवले आहे त्यामुळे कमी वेळेत नमदा तयार करता येऊ शकेल. या यंत्राला मोटार असते व ती विजेवर चालते. नमदाचा कच्चा माल या रोलिंग यंत्रात घालून तयार नमदाबाहेर येतो.’ जुफाला प्रत्येक ठिकाणी न्यायाधीशांसमोर या यंत्राने बनवलेले नमुने सादर करावे लागले आहेत. जुफा म्हणाली की, ‘लोक मला विचारायचे की, तू कुठल्या विचारांत गुंग आहे?. तुला जे पाहिजे ते काही होणार नाही. माझे बालपणापासून स्वप्न होते की, मी असे काही काम करावे की, सगळ्यांनी मला वृत्तपत्रांत व दूरचित्रवाणी वाहिन्यांवर बघावे. ते तसे काही मी आता करून दाखवले आहे.’ जुफाला या यंत्रासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. २०१६ मध्ये तिला एपीजे अब्दुल कलाम अवॉर्डही दिला गेला. जुफाचे वडील शेख अहमद इकबाल म्हणाले की, त्यांनी जुफाचा अभिमान आहे.मुलींनी पुढे पडण्यावर जुफा म्हणाली की, मुली काही करू शकणार नाहीत हे समजण्याचे दिवस आता राहिले नाहीत. आता केवळ काश्मीरच नाही तर सगळ्या जगातील मुली पुढे येत आहेत. श्रीनगरमधील क्राफ्ट डिझायनिंग इन्स्टिट्यूटचे फॅकल्टी मेंबर यासीर अहमद म्हणाले की, ‘जुफाने बनवलेले यंत्र काश्मीरमध्ये प्रथमच तयार झाले आहे. या यंत्रामुळे या उद्योगातील लोकांना फायदा होईल.’