शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रोहित, कन्हैयाला न्याय द्या!

By admin | Updated: February 24, 2016 02:53 IST

संसदेच्या बजेट अधिवेशनाचा मुहूर्त साधून मंगळवारी ‘जस्टीस फॉर रोहित अँड कन्हय्या’ अशी हाक देत जेएनयू विद्यार्थी संघासह एनएसयूआय, डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना,

नवी दिल्ली : संसदेच्या बजेट अधिवेशनाचा मुहूर्त साधून मंगळवारी ‘जस्टीस फॉर रोहित अँड कन्हय्या’ अशी हाक देत जेएनयू विद्यार्थी संघासह एनएसयूआय, डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना, व ‘आप’च्या विद्यार्थी संघटनेने दिल्लीच्या प्रमुख रस्त्यांवरून जंतर मंतरपर्यंत एका संयुक्त मोर्चाचे आयोजन केले. विद्यार्थ्यांना संबोधित करतांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या करणाऱ्या रोहित वेमुलाला मृत्यूनंतरही न्याय मिळालेला नाही. ज्या केंद्रीय मंत्र्यांवर याबाबत आरोप झाले, त्यांची साधी चौकशीही आजपर्यंत झाली नाही. हैदराबाद आणि जेएनयू परिसरात जे घडले त्याला भाजपची अभाविप ही संघटनाच जबाबदार आहे, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.रोहितच्या कुटुंबीयांची ओळख करून देत प्रकाश आंबेडकरांनीही मोर्चाला उद्देशून भाषण केले. रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यावेळी म्हणाले, ‘रोहितला न्याय मिळावा, यासाठी आम्ही इथे आलो आहोत. त्याच्या आत्महत्याप्रकरणात स्मृती इराणी, बंडारू दत्तात्रय व विद्यापीठाच्या कुलगुरूंची चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. (विशेष प्रतिनिधी)जंतर-मंतर राहुल गांधी, केजरीवाल, प्रकाश आंबेडकरांची उपस्थितीआंबेडकर भवनापासून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो विद्यार्थ्यांबरोबर रोहितचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. मोदी सरकार, भाजप व रा.स्व. संघाच्या विरोधात आक्रमक घोषणा देत हा मोर्चा जंतर मंतर वर पोहोचला, तेव्हा राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, प्रकाश आंबेडकरांसह काही डावे नेतेही तिथे झाले. या नेत्यांच्या उपस्थितीमुळे मोर्चाला खूपच महत्त्व मिळाले. भाजपकडून सत्तेचा दुरूपयोग भाजपने सत्तेचा उघड दुरूपयोग चालवला असल्याचा आरोप करून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, संघाची कालबाह्य विचारसरणी लादण्यासाठी अभाविपसारख्या संघटनांच्या चिथावणीवरून देशभर महाविद्यालये व विद्यापीठांच्या प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर सुरू आहे. विविध पक्षाच्या खासदारांनी या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. त्यात महाराष्ट्रातील काँग्रेस खासदार भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, राजीव सातव, बिहारचे पप्पू यादव आदींचा समावेश होता.विद्यार्थ्यांवर दहशत बसवण्यासाठी विद्यापीठ परिसरात पोलीस तैनात केले जात आहेत. अभ्यासाच्या वातावरणावर तणावाची छाया निर्माण केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज यापुढे दडपू शकणार नाही, असा कायदा करणे गरजेचे आहे.