पाइपलाइनमुळे रस्त्यांना खड्डे
By admin | Updated: June 8, 2016 01:50 IST
कान्हूरमेसाई : शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील चिंचोली मोराची गणेगाव, खैरेवाडी परिसरात पाइपलाइनमुळे रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. या रस्त्यावर पाइपलाइनमुळे खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे रांजणगाव गणपती येथे कंपनीत जाणार्या कामगारांच्या अपघातात वाढ झाली आहे.
पाइपलाइनमुळे रस्त्यांना खड्डे
कान्हूरमेसाई : शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील चिंचोली मोराची गणेगाव, खैरेवाडी परिसरात पाइपलाइनमुळे रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. या रस्त्यावर पाइपलाइनमुळे खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे रांजणगाव गणपती येथे कंपनीत जाणार्या कामगारांच्या अपघातात वाढ झाली आहे. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्ते मुळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अत्यंत खराब झाले आहेत. कामासाठी रस्त्यावर पडलेली खडी गेले कित्येक महिने तशीच पडून आहे. रस्त्यावर खडी पसरत चालली आहे. त्यातच शेतकर्यांनी खोदलेल्या पाइपलाइनमुळे रस्त्यांची वाट लागली आहे. डांबरीकरण खोदून शेतकरी पाइपलाइन टाकल्यावर पुन्हा रस्ता दुरुस्त करत नाहीत. बहुतांश शेतकरी पाइपलाइनचा खड्डा बुजविण्यासाठी फक्त मातीचा वापर करतात. मातीचा भराव खचून रस्त्याच्या मधोमध आडवा खड्डा निर्माण होतो. या खड्ड्यामुळे रांजणगाव गणपती, कोंढापुरी, शिक्रापूर परिसरात कामानिमित्त येणार्या-जाणार्यांना या खड्ड्यांचे झटके सोसावे लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन ताबडतोब खड्डे बुजविण्याची मागणी चिंचोली मोराचीचे सरपंच स्मिता धुमाळ यांनी केली आहे. फोटो : चिंचोली मोराची वरूडे (ता.शिरूर) परिसरात पाइपलाइनमुळे रस्त्याची वाट लागली आहे.