शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

राजद, काँग्रेसशी युती करणार -शरद यादव

By admin | Updated: June 4, 2015 23:35 IST

बिहारमधील विधानसभा निवडणूक काँग्रेस, राजद आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकजुटीने लढणार असल्याचे संयुक्त जदचे अध्यक्ष (जेडी- यू) शरद यादव यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : जनता परिवाराच्या विलीनीकरणाचा गुंता अद्याप सुटला नसला तरी बिहारमधील विधानसभा निवडणूक काँग्रेस, राजद आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकजुटीने लढणार असल्याचे संयुक्त जदचे अध्यक्ष (जेडी- यू) शरद यादव यांनी गुरुवारी स्पष्ट केले. भाजपविरुद्ध धर्मनिरपेक्ष युती स्थापन करण्याचा तिढा गेल्या काही आठवड्यांपासून कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले.लालूप्रसाद यादव यांचे खास निकटस्थ आमदार भोला यादव यांनी बुधवारी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जनता परिवाराच्या विलीनीकरणाला होत असलेल्या विलंबाबाबत पक्षाच्या खासदार-आमदारांशी सल्लामसलत चालविल्याच्या पार्श्वभूमीवर शरद यादव यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.नितीशकुमार यांनी राजदशी युती प्रत्यक्षात न उतरल्यास काँग्रेससोबत युतीबाबत चाचपणी चालविली असल्याचे वृत्त असताना लालूप्रसाद यांनी धर्मनिरपेक्ष आघाडीसंबंधी चर्चा निष्फळ ठरल्याचे वृत्त खोडसाळ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)राजद आणि संजद वेगळा मार्ग अवलंबणार असल्याचे तर्कवितर्क शरद यादव यांनीही फेटाळून लावले. जनता परिवाराच्या ऐक्याची घोषणा यापूर्वीच झाली आहे. ऐक्य प्रत्यक्षात येईल, असा मला विश्वास आहे, ते देशासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणाले. ४जनता परिवारातील समाजवादी पक्ष, राजद, संजद, जद(एस), आयएनएलडी आणि समाजवादी जनता पार्टी या सहा पक्षांच्या विलीनीकरणाची घोषणा एप्रिलमध्ये झाली होती. ४मुलायमसिंग यादव यांची प्रमुख म्हणून निवडही घोषित करण्यात आली, तथापि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोेषित करण्यासह जागांच्या वाटपाबाबत नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांचे मतभेद उघड झाल्यानंतर विलिनीकरण अधांतरी लटकले आहे.