व्याजाच्या पैशावरुन जबर मारहाण
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
पुणे : व्याजाने घेतलेली रक्कम परत न केल्याच्या कारणावरुन दुकानदाराला जबर मारहाण करीत त्याच्या दुकानाची चावी आणि एटीएममधील पाच हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेण्यात आली. वारज्यातील जयदीप चौकात मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
व्याजाच्या पैशावरुन जबर मारहाण
पुणे : व्याजाने घेतलेली रक्कम परत न केल्याच्या कारणावरुन दुकानदाराला जबर मारहाण करीत त्याच्या दुकानाची चावी आणि एटीएममधील पाच हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेण्यात आली. वारज्यातील जयदीप चौकात मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.सचिन ऊर्फ भाऊ शिवाजी जामगे (रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मनोहर काकतकर (वय ४६, रा. वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. काकतकर आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. जामगे याच्याकडून काकतकर यांनी व्याजाने पैसे घेतले होते. हे पैसे वेळेत दिले नाहीत या कारणावरुन चिडलेल्या आरोपीने साथीदारांसह जयदीप चौकामधून काकतकरांना जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून शुक्रवार पेठेतील हॉटेलमध्ये आणले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हॉटेलमधील जग, ग्लास आणि पळीने तोंडावर मारले. त्यांच्या खिशामधून मोबाईल आणि एटीएम कार्ड काढून घेतले. या कार्डाचा वापर करुन पाच हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच काकतकर यांच्या शनिवार येथे असलेल्या कपड्याच्या दुकानाची चावी घेतली. या दुकानातील विक्रीसाठी असलेले कपडेही घेऊन गेला. ----------