विद्यार्थिनीची छेड काढणार्या मुख्याध्यापकास सश्रम कारावास
By admin | Updated: May 11, 2014 19:34 IST
विद्यार्थिनीची छेड काढणार्या मुख्याध्यापकास सश्रम कारावास
विद्यार्थिनीची छेड काढणार्या मुख्याध्यापकास सश्रम कारावास
विद्यार्थिनीची छेड काढणार्या मुख्याध्यापकास सश्रम कारावासआमडी शाळेतील घटना : अवघ्या तीन महिन्यात निकालवरोरा: आपल्याच शाळेतील इयत्ता सहावीमध्ये शिकणार्या विद्यार्थिनीशी छेडखानी करणार्या मुख्याध्यापकास बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण अधिनयम २०१२ अंतर्गत वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने तीन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अवघ्या तीन महिन्यात सदर प्रकरणाचा निकाला लागला.वरोरा तालुक्यातील आमडी गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गणेश झोलबाजी दांडेकर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता. २६ जानेवारीला झेंडावंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्याच शाळेत सहाव्या वर्गात शिकणार्या विद्यार्थिनीला या मुख्याध्यापकाने तिच्या घरी नेले. नंतर पुन्हा आपल्यासोबत शाळेत आणले. त्यावेळी शाळेच्या परिसरात कुणीही नसल्याचे बघत शाळेच्या नवीन बांधकामाकडे विद्यार्थिनीला नेले व तिच्यासोबत असभ्य वर्तन करणे सुरू केले. तिला ही बाब कुणालाही सांगू नको म्हणून धमकीही दिली. त्यानंतर विद्यार्थिनीने याची माहिती आपल्या आई-वडीलांना सांगितली. त्यांनी तात्काळ वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली. मुख्याध्यापक गणेश दांडेकर याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. सदर प्रकरणाचा तपास तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक गिता तांगडे व पोलीस उपनिरीक्षक रविशंकर तिवारी यांनी पूर्ण करून वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सहाय्यक सरकारी वकील जयंत ठाकरे यांनी सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ई.एन. काझी यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून घेत गणेश दांडेकर याला बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ च्या कलम ८ व ३५४ (अ) मध्ये तीन वर्ष सश्रम कारावास तसेच पाच हजार रुपयांचा दंड, दंड भरला नाही तर तीन महिने सश्रम कारावास तर कलम ५०६ मध्ये सहा महिने सश्रम कारावास एक हजार रुपये दंड व दंड अदा केला नाही तर एक महिन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)