शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

सध्या तरी अखिलेशच मुख्यमंत्री - मुलायमसिंह

By admin | Updated: October 25, 2016 16:00 IST

सध्या अखिलेश यादव मुख्यमंत्रीपदावर आहेत. मात्र 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळाल्यास नव्या मुख्यमंत्र्याची निवड आमदार करतील, असे मुलायम यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 25 -  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका अवघ्या  काही महिन्यांवर आलेल्या असतानाच  समाजवादी पक्षामध्ये यादवी माजली आहे. सपा प्रमुख मुलायम सिंह यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील बेबनाव हे सर्वांच्या चर्चेचे कारण ठरलेले असतानाच आज मुलायमसिंह यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्ष व परिवारात एकी असल्याचे नमूद करतानाच ' अखिलेश यादव हेच सध्या मुख्यमंत्रीपदी कायम 'असल्याचेही स्पष्ट केले. 
मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण हे आमदारच ठरवतील असेही त्यांनी सांगितले.  
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे त्यांचे वडील मुलायमसिंग आणि काका शिवपाल यादव यांच्याशी पूर्णपणे संबंध बिघडल्याचे चित्र दिसत आहे. समाजवादी पक्षात तीव्र झालेल्या वर्चस्वाच्या लढाईंमुळे पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांच्या मंगळवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 
मात्र मुलायम सिंह यांनी पक्ष व यादव परिवारात एकी असल्याचे नमूद करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच अखिलेश अद्यापही मुख्यमंत्रीपदी असून मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आलेल्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याच निर्णय तेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान ज्यांच्यावरून या वादाची सुरूवात झाली ते  शिवपाल यादव व सर्व बरखास्त मंत्री बैठकीला उपस्थित होते मात्र अखिलेश यादव अनुपस्थित राहिल्याने पक्षात अद्यापही सारे काही आलबेल नसल्याचेच संकेत मिळत आहेत.