आवर्तन प्रश्नी नेवाशात मोर्चा--- जोड
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
या दुष्काळामुळे शेतमालाचे होणारे प्रचंड प्रमाणातील नुकसान पुढील १० ते १५ वर्षातही भरून निघणार नाही. शेतकर्यांच्या धरणातील हक्काच्या पाण्यासाठी तालुक्यातील जनतेला बरोबर घेऊन मोठा लढा द्यावा लागेल असेही गडाख यांनी यावेळी स्पष्ट केले.
आवर्तन प्रश्नी नेवाशात मोर्चा--- जोड
या दुष्काळामुळे शेतमालाचे होणारे प्रचंड प्रमाणातील नुकसान पुढील १० ते १५ वर्षातही भरून निघणार नाही. शेतकर्यांच्या धरणातील हक्काच्या पाण्यासाठी तालुक्यातील जनतेला बरोबर घेऊन मोठा लढा द्यावा लागेल असेही गडाख यांनी यावेळी स्पष्ट केले.अध्यक्षपदावरून बोलताना यशवंतराव गडाख म्हणाले, दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीत जिल्ह्यातील कुकडी धरणातून पाणी सुटले, भंडारदरा धरणातून पाणी सुटले व मुळा धरण निम्मे भरलेले असताना धरणातून पाणी सुटलेच पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी मिळवणे तसेच जनावरांच्या छावण्या चालू झाल्या पाहिजे. या प्रमुख मागण्या हाती घ्याव्या लागणार आहेत. गेली दोन वर्षे शंकररावांनी तालुक्याला दुष्काळ जाणवू दिला नाही. त्यासाठी त्यांच्यात धाडस होते, त्यांच्या शब्दात वजन होते. मात्र आजच्या लोकप्रतिनिधींचे कुणी त्यांच्याच सरकारमध्ये ऐकते की नाही असा प्रश्न तालुक्यातील जनतेला व मला पडला आहे.मेळाव्यास तालुक्यातील शेतकरी, बाजार समितीचे मतदार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यानंतर नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमधून नेवासा तहसीलपर्यंत पायी मोर्चाने जावून शंकरराव गडाख, पांडुरंग अभंग, विठ्ठलराव लंघे यांचेसह कार्यकर्त्यांनी मुळा धरणातून पाणी सोडावे, बंधारे भरून द्यावे, मुळा नदीला पाणी सोडावे, तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करून पूर्ण दाबाने आठ तास वीज पुरवठा करावा, जनावरांच्या छावण्या त्वरित सुरू कराव्यात, शेतकर्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार हेमलता बडे यांना देण्यात आले. तर यावेळी मुळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता झावरे यांनी शासन निर्णय आतापर्यंत झालेला नाही. निर्णय होताच मुळा धरणातून पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. शासन निर्णय नसताना पाणी सुटल्याचे जाहीर करणार्या लोकप्रतिनिधींचा मोर्चात सामील झालेल्या शेतकर्यांनी जाहीर निषेध केला.