सीताबाई कला महाविद्यालयाचा निकाल ६१.६२ टक्के
By admin | Updated: June 3, 2014 01:08 IST
अकोला : इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालात शहरातील सीताबाई कला महाविद्यालयाचा निकाल ६१.६२ टक्के लागला आहे.
सीताबाई कला महाविद्यालयाचा निकाल ६१.६२ टक्के
अकोला : इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालात शहरातील सीताबाई कला महाविद्यालयाचा निकाल ६१.६२ टक्के लागला आहे. महाविद्यालयातून ९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये महाविद्यालयाच्या मंजिरी श्रीकृष्ण वैद्य हिने सर्वाधिक ७९ टक्के प्राप्त केले. तर गजला अब्बास अली हिने ७२.६१ टक्के, वनिता जनार्दन गायकवाड हिने ६९.२३ टक्के व कपिल गोरखनाथ खंडारे याने ६९.२३ टक्के गुण प्राप्त केले.