शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लोकपाल नियुक्तीवरील निकाल राखीव

By admin | Updated: March 29, 2017 01:36 IST

लोकपालदेशात लोकपाल नियुक्त करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला

नवी दिल्ली : देशात लोकपाल नियुक्त करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला. लोकपाल कायद्यातील विरोधी पक्षनेत्याच्या व्याख्येत सुधारणा होईपर्यंत लोकपाल नियुक्त करता येत नाही, असे महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सुनावणीदरम्यान सांगितले. ते म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते लोकपाल निवड समितीचे सदस्य असतात. सध्या लोकसभेत विरोधी पक्षनेताच नाही, कॉँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक संख्याबळ नाही. हा अडथळा दूर करण्यासाठी लोकपाल कायद्यात सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेता मानण्याची सुधारणा करण्यात  येणार आहे. ती होईपर्यंत लोकपालाची नियुक्ती करता येऊ शकत नाही. संसदेने लोकपाल विधेयक २०१३ मध्ये संमत केले होते. मात्र, सरकारने जाणीवपूर्वक लोेकपालाची नियुक्ती केली नाही, असे वरिष्ठ विधिज्ञ शांती भूषण म्हणाले. लोकपालाची त्वरित नियुक्ती केली जावी, असे लोकपाल कायद्यातच म्हटलेले आहे, असेही ते म्हणाले. भ्रष्टाचार प्रतिबंधक लोकपाल प्रणाली आणण्यासाठी लोकपाल कायद्यात सुधारणा सुचविणाऱ्या संसदीय स्थायी समितीच्या अहवालाची प्रत आपल्यासमोर ठेवा, असे आदेश न्यायालयाने ७ डिसेंबर २०१६ रोजी दिले होते. लोकपालाच्या नियुक्तीला होत असलेल्या विलंबाबद्दल न्यायालयाने गेल्यावर्षी २३ नोव्हेंबर रोजी सरकारला खडे बोल सुनावले होते. सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला निवड समितीत आणण्यासाठी कायद्यात सुधारणा न केल्याच्या कारणास्तव लोकपाल कायद्याला गैरलागू करता येऊ शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)तसा बदल करायला सांगितलेच होतेअण्णा हजारे यांच्या देशव्यापी आंदोलनामुळे लोकपाल कायदा अस्तित्वात आला आहे. लोकपाल निवड समितीत विरोधी पक्षनेता असणे ही बाब गौण असून, या समितीविनाही पुढे जाता येऊ शकते. या समितीत सर्वांत मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचा समावेश करून ती बदलता येऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.