शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

दाभिल येथील ग्रामसभेत रेशन दुकानदारासह पोलीस पाटील बदलण्याचा ठराव

By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST

* सभेत झाली धक्काबुक्कीदाभिल (ता. आजरा) येथील ग्रामसभेतील चर्चा ऐकण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पटांगणात महिला व नागरिकांनी केलेली गर्दी.क्रमांक : २२१२२०१४-गड-१२आजरा : दाभिल येथील स्वस्त धान्य दुकनदार जयश्री विठोबा यादव यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याबरोबरच विठोबा मारुती यादव यांचे पोलीस पाटील पद रद्द करावे, असा ठराव आज, सोमवारी बोलविण्यात आलेल्या ...


* सभेत झाली धक्काबुक्की
दाभिल (ता. आजरा) येथील ग्रामसभेतील चर्चा ऐकण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पटांगणात महिला व नागरिकांनी केलेली गर्दी.
क्रमांक : २२१२२०१४-गड-१२
आजरा : दाभिल येथील स्वस्त धान्य दुकनदार जयश्री विठोबा यादव यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याबरोबरच विठोबा मारुती यादव यांचे पोलीस पाटील पद रद्द करावे, असा ठराव आज, सोमवारी बोलविण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत करण्यात आला. यावेळी काही ग्रामस्थांची व सदस्य श्रावण वाझे यांच्यात शाब्दिक चकमक व धक्काबुक्की झाली.
सरपंच स्वाती श्रीपती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दाभिल ग्रामपंचायतीसमोर खास सभा बोलविण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांनी यादव दाम्पत्याचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याबरोबरच विठोबा यादव यांचे पोलीस पाटील पद रद्द करावे, असा ठराव करण्यात आला. सदर बैठकीत गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या तक्रारीचा विषय चर्चेत घेण्यात आला.
सदर विषयाला श्रावण वाझे यांनी हरकत घेतली. ज्या विषयासाठी सभा बोलविली आहे त्याच विषयावर चर्चा व्हावी, असे त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. पण, ग्रामस्थांनी वाझे यांचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार शाब्दिक चकमक व वाझे यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला. यामध्ये वाझे हे किरकोळ जखमी झाले.
वातावरण शांत झाल्यावर पुन्हा एकेवळ सभेला सुरुवात झाली. ज्ञानदेव गुरव यांनी पाणीपुरवठा योजनेची माहिती दिली. पाणीपुरवठा योजनेबाबत बोगस स‘ाद्वारे तक्रारी करणार्‍यांचा निषेध नोंदवत त्यांच्यावर मयत लोकांच्या व बोगस तक्रारी करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणीही केली.
चर्चेत शांताराम पाटील, बबन कांबळे, दीपक गवळी, शांता कांबळे, रेखा सुतार, उपसरपंच संभाजी सुतार, अरूणा नार्वेकर यांनी सहभाग घेतला. ग्रामसेवक एल. आर. वापस्कर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)