शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नापासांची जुलैमध्ये फेरपरीक्षा!

By admin | Updated: June 12, 2015 05:38 IST

मार्च २०१५मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेत (दहावी) अनुत्तीर्ण झालेल्या दीड लाख विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै २०१५च्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार

मुंबई : मार्च २०१५मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेत (दहावी) अनुत्तीर्ण झालेल्या दीड लाख विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै २०१५च्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार असून, २० आॅगस्टदरम्यान निकाल जाहीर करण्यात येईल. १ सप्टेंबरपासून त्यांचा पुढील शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू होईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. तावडे म्हणाले की, नापास विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया घालविण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे त्यांना अजून एक संधी लगेचच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यंदा सुमारे दीड लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले; त्यांना या परीक्षेस बसून आपले वर्ष वाचविण्याची संधी यानिमित्ताने मिळत आहे.  येत्या १५ जूनपासून अर्ज स्वीकारले जातील. १५ जुलै दरम्यान प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षा होऊन आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल घोषित होईल. यामुळे आॅक्टोबरमध्ये होणारी परीक्षा बंद होईल, असे तावडे यांनी सांगितले. ५० टक्के निकाल लागलेल्या शाळांची बैठकराज्यातील सुमारे ३५० शाळांचे निकाल ५० टक्क्यांहून कमी लागले आहेत. अशा शाळांचे संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांची बैठक बोलविणार असून संबंधित शाळांना कोणत्या अडचणी आहेत, या शाळांचा निकाल कमी का लागला? याबाबत सविस्तर चर्चा जूनच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येईल, असे तावडे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)