शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अहवाल म्हणजे ‘पूर्ण सत्य’ नाही!

By admin | Updated: June 3, 2016 02:51 IST

हरियाणातील जाट आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारावरील प्रकाशसिंग समितीने सादर केलेला अहवाल हा ‘पूर्ण सत्य’ नाही, तो केवळ एक ‘माहितीपर’ अहवाल आहे

चंदीगड : हरियाणातील जाट आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारावरील प्रकाशसिंग समितीने सादर केलेला अहवाल हा ‘पूर्ण सत्य’ नाही, तो केवळ एक ‘माहितीपर’ अहवाल आहे आणि हा अहवाल स्वीकारणे राज्य सरकारसाठी बंधनकारक नाही, असे हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी म्हटले आहे. या अहवालात ज्या लोकांची नावे घेण्यात आली आहेत, त्यांपैकी काही लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असतानाच विज यांनी हे मत व्यक्त केले आहे, हे येथे उल्लेखनीय.पत्रकारांशी बोलताना विज म्हणाले, ‘हा ४५१ पानांचा अहवाल आहे आणि आम्ही प्रत्येक अनुच्छेद अगदी काळजीपूर्वक वाचत आहोत. हा एक अहवाल आहे. एखादी (पवित्र) गीता नाही. प्रकाशसिंग यांनी जे काही लिहिले ते सर्वच्या सर्व सत्य असेल किंवा ज्या अधिकाऱ्यांची त्यात नावे घेण्यात आली आहेत, ते सर्व दोषीच असतील, असे नव्हे. काही अधिकारी फार चांगले असू शकतात. त्यांचा मागील रेकॉर्ड चांगला असू शकेल. त्यामुळे आम्ही सर्व गोष्टी तपासून बघत आहोत.’अंबालाच्या कँट येथून पाचवेळा भाजपा आमदार राहिलेले विज पुढे म्हणाले, सरकारला जेथे जेथे उचित वाटेल तेथे तेथे कारवाई करण्यात आली आहे. प्रकाशसिंग समितीचा अहवाल केवळ ‘माहितीपर’ अहवाल आहे आणि हा अहवाल सरकारसाठी बंधनकारक नाही. प्रकाशसिंग यांनी तपास केला व माहितीसह अहवाल आम्हाला सादर केला. तसे पाहिले तर हा अहवालदेखील पूर्ण नाही. कारण चौकशी समितीचे तीन सदस्य होते व त्यांपैकी दोघांनी या अहवालावर स्वाक्षरी केलेली नाही. (वृत्तसंस्था)