शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पैसे फेडण्यासाठी तिने सरपंचपदच गहाण ठेवले

By admin | Updated: June 24, 2015 00:05 IST

पैशाची परतफेड करण्यासाठी जमीन, शेत, घर, सोने, दागिने किंवा अगदी वेळच आली तर मंगळसूत्र सावकाराकडे गहाण ठेवण्याचे प्रकार ‘आम’ बात बनली असताना

रतलाम : पैशाची परतफेड करण्यासाठी जमीन, शेत, घर, सोने, दागिने किंवा अगदी वेळच आली तर मंगळसूत्र सावकाराकडे गहाण ठेवण्याचे प्रकार ‘आम’ बात बनली असताना चक्क सरपंचपदच गहाण ठेवत पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी दुसऱ्याकडे देण्याचा अफलातून व अभूतपूर्व प्रकार मध्यप्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात घडला आहे. महिलांच्या सबलीकरणाकडे पाऊल टाकताना अशाप्रकारे पळवाटा शोधल्या जाणे ही गंभीर चिंतेची बाब असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटू लागल्या आहेत.अशिक्षित बगदीबाई मेवासा ग्रामपंचायतच्या सरपंच बनल्या; मात्र नावालाच. कारण त्यांच्याकडील अधिकार त्यांनी स्टॅम्प पेपरवर ‘पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी’द्वारे दीपक शर्मा नावाच्या व्यक्तीकडे सोपविले आहेत. ५०० रुपयांच्या स्टॅम्पवरील या कराराची नोटरीत नोंद झाली आहे. त्याचे कारण निवडणुकीसाठी घेतलेल्या १५ हजारांची बगदीबाईला परतफेड करता आली नाही. दीपक शर्मा हेच सरपंचाच्या आविर्भावात कामकाज सांभाळत होते. या ग्रामपंचायतीचे नवे सचिव मांगीलाल चौधरी यांनी नियुक्तीनंतर शर्मा यांच्या कामात हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी बगदीबार्इंचे सरपंचपद गहाण असल्याचे दस्तऐवज दाखविले व हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यावर्षी २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत बगदीबाई विजयी झाल्या. शर्मा यांनी दोनच दिवसानंतर करारापत्रावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेत सरपंचपदाचे सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेतले.अधिकारी व जनतेला भेटण्याचे कामही त्यांच्याकडेच असेल, असे करारात नमूद असून कहर म्हणजे जिल्हा न्यायालयाचे नोटरी आणि वकील कैलाश शर्मा यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. यास बगदीबार्इंचे मजूर पती कन्हैयालाल यांची संमती होती. (वृत्तसंस्था)