शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या प्रकल्पांना यापुढे मुदतवाढ नाही

By admin | Updated: April 4, 2015 05:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकट्या महाराष्ट्रातील २६ महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडल्याची गंभीर दखल घेतली आहे. काही प्रकल्पांच्या कामांना झालेला विलंब पाहता

हरीश गुप्ता, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकट्या महाराष्ट्रातील २६ महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडल्याची गंभीर दखल घेतली आहे. काही प्रकल्पांच्या कामांना झालेला विलंब पाहता प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास आणखी १२ वर्षांचा (१४४ महिने) कालावधी लागू शकतो. वेळेत पूर्ण होऊ न शकणाऱ्या या प्रकल्पांवरील वाढलेला खर्च सुमारे २० हजार कोटींच्या घरात आहे. मोदींनी प्रकल्पांच्या कूर्मगतीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून, यापुढे महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकल्पाला विलंब होता कामा नये, असा आदेश पंतप्रधानांनी दिला आहे. यापुढे या प्रकल्पांना कोणत्याही परिस्थितीत आणखी मुदतवाढ मिळणार नाही, असे मोदींनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना आणि केंद्र सरकारच्या सचिवांना बजावले आहे. केंद्रात आणि राज्यात संपुआचे सरकार असतानाही महाराष्ट्रात प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात झालेल्या विलंबाबद्दलही मोदींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.देशभरात बहुराज्यीय संबंधातील ६१ प्रकल्प प्रलंबित असून, त्यातील फक्त महाराष्ट्राशी संबंध असणाऱ्या किंवा महाराष्ट्रातून जाणाऱ्या २६ प्रकल्पांची अंमलबजावणी होऊ न शकल्याने (तक्त्यात नमूद) विलंबामुळे खर्चात आणखी २० हजार कोटींनी वाढ होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सरकारी खजिन्यावर १ लाख १० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. बेलापूर-सीवूड अर्बन विद्युत दुहेरी रेल्वेमार्गाच्या खर्चात ३५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा प्रकल्प २००४ मध्येच पूर्ण व्हायला हवा होता. मोदींनी आता मार्च २०१६ ही मुदत घालून दिली आहे. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (अर्बन ट्रान्सपोर्ट) २ आता मार्च २०१९ साली पूर्ण केला जाणार असून, त्याच्यावरील अंतिम खर्च ६ हजार ८२१ कोटी रुपये असेल.विलंब होणाऱ्या प्रकल्पांच्या यादीत सर्वाधिक पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे २८ प्रकल्प असून, वाढलेली किंमत ५३ हजार कोटींच्या घरात जाईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या १२ प्रकल्पांवरील वाढीव खर्च १४ हजार कोटींच्या घरात आहे.