शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

रिलायन्स Jioनं केला परवाना मिळवताना झोल

By admin | Updated: March 8, 2017 23:49 IST

रिलायन्स जिओबाबत सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8 - दूरसंचार कंपनी रिलायन्स जियोने नवनवे रेकॉर्ड केले असून, आतापर्यंत या कंपनीने 10 कोटी ग्राहक जोडले आहेत. हे जागतिक रेकॉर्ड असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अल्पावधीतच ग्राहकांमध्ये लोकप्रिय झालेल्या दूरसंपर्क कंपनी रिलायन्स जिओबाबत सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका ऑडिट रिपोर्टनुसार, गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत रिलायन्सनं एकूण उत्पन्नापैकी 63 कोटी रुपये कमी दाखविले आहेत. या तीन वर्षांच्या कालावधीत रिलायन्स कंपनीने परकीय विनिमय दरातून झालेला फायदा उत्पन्नात दाखविला नाही. त्यानंतर ऑडिट महानिदेशालया(डाक आणि दूरसंचार)ने कंपनीने तीन वर्षांच्या कालावधीत परवाना शुल्क कमी भरल्याची माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. पाच पानांचा हा ऑडिट रिपोर्ट 22 फेब्रुवारी 2017ला समोर आला. या ऑडिट रिपोर्टनुसार, 2012-13 आर्थिक वर्षात 1.29 कोटी रुपयांचा कंपनीला फायदा झाला होता. तर 2013-14 या आर्थिक वर्षात 41.67 कोटींचं उत्पन्नाच्या स्वरूपात फायदा रिलायन्सला मिळाला होता. 2014-15मध्ये 20.18 कोटी रुपयांचा परकीय चलनात रिलायन्सला फायदा झाला आहे. तसेच लायसन्स शुल्क मिळवून एकूण 63.77 कोटी रुपये कमी दाखवण्यात आल्याची माहिती या ऑडिट रिपोर्टमधून उघड झाली आहे. फायद्याच्या स्वरूपात रिलायन्स जिओनं सरकारला परवाना शुल्काच्या माध्यमातून महसूल दिला नाही.