शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

भटकंतीचे जीवन जगणाऱ्या मेंढपाळांकडे शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: October 5, 2015 03:19 IST

गुजरात राज्यातील कछ जिल्ह्यातील शेळी-मेंढीचे पालन करून आपली व आपल्या कुटुंबीयांच्या पोटाची खडगी भरण्याकरिता गेल्या ५0 वषार्पासून भटकंती करून मेंढपाळ जीवन जगत आहेत

फारुख शेख, पाटणगुजरात राज्यातील कछ जिल्ह्यातील शेळी-मेंढीचे पालन करून आपली व आपल्या कुटुंबीयांच्या पोटाची खडगी भरण्याकरिता गेल्या ५0 वषार्पासून भटकंती करून मेंढपाळ जीवन जगत आहेत. मात्र अद्यापही त्यांच्यापर्यंत शासनाची कोणतीच योजना पोहचलेली नाही.प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्या डेऱ्याला भेट दिली असता डेऱ्याचा प्रमुख पुना प्रभु रब्बारी याने समस्याचा पाढाच वाचून दाखविला. या डेऱ्यात १२ कुटुंब असलेल्या लोकांमध्ये कुटुंब प्रमुख प्रभु रब्बारी, सुरेश रब्बारी, रामा किशन रब्बारी, पाला जिवा रब्बारी, गोवा सोमा रब्बारी, रतन सोमा रब्बारी, जमा रवा रब्बारी, देवशी शामा रब्बारी, साजन भोला रब्बारी, रवा कुमार रब्बारी इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये एकूण ६0 लोकसंख्या आहे. पुरुष व महिलांसह बालकांचाही समावेश आहे. यांची दिनचर्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपले बिऱ्हाड पाठीवर घेऊन शेळ्या-मेंढ्या व उंटाच्या मागे चालत राहणे व जिथे संध्याकाळ झाली, तिथे जंगलातच नदी नाल्याच्या काठावर आश्रय घेऊन पोटाची खडगी भरणे. या लोकांमध्ये नवजात बालकांपासून तर ८0 वर्षापर्यंतचे वृद्ध आहे.पाऊस, वारा, वादळ व विजेचा कडकडातही डोंगराच्या कुशीत त्यांना रात्र काढावी लागते. आमची प्रत्येक रात्र वैऱ्याची असते. जंगली जनावरे व चोरांचाही सामना करावा लागतो, असे सांगताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. १२ कुटुंबामध्ये एकूण ६0 लोकात लहान मुले आहेत. अनेकांचा जन्म जंगलातच झाल्याचीे गंभीर बाब लोकांनी बोलून दाखविली. प्रभु नारंग रब्बारी हा ८0 वर्षीय वृद्ध असून उभे आयुष्य त्याने वनवासातच घालविले.या समुदायातील अनेकजण अशिक्षित आहे. वणवण भटकून जीवन जगत असल्याने मुलांनाही शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. डेऱ्याचा प्रमुख रब्बारी याने सांगितले की मागील ५0 वषार्पासून पूर्ण भारतभर आम्ही भ्रमण करीत असतो, आम्ही सर्व गुजरात राज्याचे रहिवासी आहोत. दु:खाचे डोंगर उरात घेऊन जीवन जगणाऱ्यांवर शासनाचेही दुर्लक्ष झाले आहे.नाल्याच्या पाण्यावरच जनावरांचे व आपल्या कुटुंबाची तहान भागवावी लागते. सर्व कुटुंब जंगलातच वास्तव्य करीत असल्याने किराणा, राशन शहरातून जंगल मागार्ने १0 ते १५ किमी अंतरावरून आणावे लागते. गावोगावी भटकंती करणाऱ्या मेंढपाळ लोकांना गावात राहू दिले जात नाही. त्यामुळे ते गावाबाहेर किंवा नाल्यालगत आपला डेरा टाकतात. पिण्याच्या पाण्यासाठी दुसरे साधन नसल्याने नाल्यातील गढूळ पाणी प्यावे लागते. यामुळे अनेक व्यक्तींना आजार जडले आहे. असे असतानाही शासनाची आरोग्य यंत्रणा किंवा शासनाची कोणती योजना त्यांच्यापर्यंत पोहचत नाही.