शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जामिनावरील आरोपींनी पुन्हा केला बलात्कार

By admin | Updated: July 19, 2016 05:55 IST

एका दलित तरुणीवर जामिनावर सुटलेल्या आरोपींनी पुन्हा बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले

रोहतक : दिल्लीपासून जवळच असलेल्या रोहतकमधील महाविद्यालयात शिकणाऱ्या एका दलित तरुणीवर जामिनावर सुटलेल्या आरोपींनी पुन्हा बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले असून, त्यामुळे तिथे प्रचंड संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणातील पाचही आरोपी फरार असून, त्यांना अटक करण्याचा पोलीस प्रयत्न करीत नसल्याची तरुणीच्या कुटुंबीयांची तक्रार आहे.याच तरुणीवर या पाचही आरोपींनी तीन वर्षांपूर्वी बलात्कार केला होता. त्या प्रकरणात दोन आरोपींना अटकही करण्यात आली होती. त्यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर ते दोघे आणि उरलेले तीन जणांनी मिळून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. ‘महाविद्यालयातून बाहेर पडत असताना आरोपींनी मला जबरदस्तीने उचलून कारमध्ये घातले आणि दूर ठिकाणी नेत त्या पाचही जणांनी बलात्कार केला,’ अशी तक्रार तिने पोलीस ठाण्यात केली आहे. ती युवती सध्या रुग्णालयात असून, ती अतिशय घाबरलेली आहे.त्या तिघांना अटक झाली असती, दोघांना जामीन मिळाला नसता आणि न्यायालयाने पाचही जणांना शिक्षा सुनावली असती, तर हा प्रकार पुन्हा घडला नसता, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आरोपींपैकी तिघे उच्च जातीतील असून, त्यांच्याकडून धमक्या मिळाल्या, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या पाचही आरोपींना सारेच जण ओळखतात, पण घटनेला तीन दिवस उलटून गेले, तरीही पोलीस त्यांना अटक करीत नसल्याचा आरोप आॅल इंडिया शेड्युल कास्ट एम्प्लॉयीज फेडरेशनचे हरियाणा विभागाचे अध्यक्ष आर. के. रंगा यांनी केला. विविध संघटनांनी स्थानिक आमदार मनिष ग्रोव्हर यांच्याही निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. पोलीस उपअधीक्षक पुष्पा खतरी म्हणाल्या की, ‘आम्ही पाचही आरोपींचा शोध घेत आहोत. पुढील कारवाईसाठी आम्ही फोरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहोत.’ (वृत्तसंस्था)>या तरुणांनी २0१३ साली तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर, आम्ही तुम्हाला पैसे देतो, पण तुम्ही हे प्रकरण मिटवून टाका, अशा धमक्या तिच्या घरच्या मंडळींना दिल्या जात होत्या, पण तिचे कुटुंबीय धमक्यांना बधले नाहीत. केवळ दोनच आरोपींना अटक झाली असून, उरलेल्या तिघांनाही ताबडतोब अटक करा, अशी मागणी कुटुंबीय सातत्याने करीत होते, पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, अशी त्यांची तक्रार आहे.