शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पीकनिहाय कर्जाचे दर निश्चित! जिल्हा तांत्रिक समित्यांकडून केली जाणार अंमलबजावणी पीकनिहाय कर्जाचे प्रामुख्याने असे आहेत हेक्टरी दर! राज्यस्तरीय समितीकडून एकूण ७० पिकांसाठी पीकनिहाय हेक्टरी

By admin | Updated: December 20, 2015 00:51 IST

संतोष येलकर/अकोला: पिकांच्या उत्पादनासाठी २०१६-१७ मध्ये बँकांकडून शेतकऱ्यांना द्यावयाच्या प्रतिहेक्टरी पीकनिहाय कर्जाचे दर शासनाच्या राज्यस्तरीय समितीमार्फत निश्चित करण्यात आले आहेत. या पृष्ठभूमीवर पीक कर्ज दराची अंमलबजावणी करण्याचे नियोजन जिल्हास्तरीय तांत्रिक समित्यांकडून जानेवारीमध्ये करण्यात येणार आहे.

संतोष येलकर/अकोला: पिकांच्या उत्पादनासाठी २०१६-१७ मध्ये बँकांकडून शेतकऱ्यांना द्यावयाच्या प्रतिहेक्टरी पीकनिहाय कर्जाचे दर शासनाच्या राज्यस्तरीय समितीमार्फत निश्चित करण्यात आले आहेत. या पृष्ठभूमीवर पीक कर्ज दराची अंमलबजावणी करण्याचे नियोजन जिल्हास्तरीय तांत्रिक समित्यांकडून जानेवारीमध्ये करण्यात येणार आहे.
८ जून २०११ आणि ५ मे २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील बँकांकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जामध्ये दरवर्षी आवश्यकतेनुसार वाढ सुचविण्यासाठी व कर्ज वाटप प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार गत १ ऑक्टोबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या सभेत २०१६-१७ या वर्षात विविध पिकांच्या उत्पादनासाठी बँकांकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिहेक्टर पीकनिहाय कर्जाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. राज्यातील खरीप, रब्बी-उन्हाळी पिकांसह भाजीपाला, फूल पिके, फळ झाडे अशा एकूण ७० पिकांसाठी पीकनिहाय कर्जाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. निश्चित करण्यात आलेले पीकनिहाय कर्जाचे दर येत्या एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहेत. पीकनिहाय कर्जाच्या दरासंबंधी जिल्हानिहाय अंमलबजावणीचे नियोजन जिल्हा तांत्रिक समित्यांकडून येत्या जानेवारीमध्ये करण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यस्तरीय समितीकडून निश्चित करण्यात आलेल्या पीकनिहाय कर्जाच्या दरापेक्षा कमाल १० ते १५ टक्के वाढीव दर ठरविण्याबाबत जिल्हा तांत्रिक समित्यांना मुभा राहणार आहे; मात्र राज्यस्तरीय समितीकडून निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा जिल्हा तांत्रिक समित्यांना पीक कर्जाचे दर कमी करता येणार नाहीत.
राज्यस्तरीय समितीकडून निश्चित करण्यात आलेल्या पीकनिहाय कर्ज दराच्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जानेवारीमध्ये होणार आहे. या बैठकीत राज्यस्तरीय समितीने निश्चित केलेल्या पीकनिहाय कर्ज दरासंबंधी नियोजन करण्यात येणार आहे; मात्र निश्चित करण्यात आलेल्या दराच्या तुलनेत पीकनिहाय कर्जाचे दर कमी करता येणार नाहीत.
- ज्ञानदीप लोणारे,जिल्हा उपनिबंधक.
/////////////////////////////