शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आझम खान विरोधात बलात्कार पीडिता कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2016 06:05 IST

बलात्काराची शिकार झालेल्या माय-लेकींनी उत्तर प्रदेशचे नगरविकासमंत्री तथा सपा नेते आझम खान यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बुलंद शहर येथे महामार्गानजीक बलात्काराची शिकार झालेल्या माय-लेकींनी उत्तर प्रदेशचे नगरविकासमंत्री तथा सपा नेते आझम खान यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हा खटला उत्तर प्रदेशबाहेर हलविण्यात यावा, तसेच आझम खान आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. २९ जुलै रोजी नोएडा येथील एक कुटुंब प्रवास करीत असताना बुलंद शहरजवळ दरोडेखोरांनी त्यांना अडवून एक महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. बलात्काराच्या घटनेमागे राज्य सरकारला बदनाम करण्याचा राजकीय कट आहे, असा आरोप आझम खान यांनी केला होता. त्याविरुद्ध पीडित माय-लेकींच्या वतीने एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅड. किसले पांडे यांच्या वतीने दाखल झालेल्या या याचिकेत म्हटले आहे की, आझम खान यांनी असे वक्तव्य करून पीडितांचा अवमान आणि विनयभंग केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच हे प्रकरण तपासासाठी दिल्लीत हटविण्यात यावे. उत्तर प्रदेश पोलिसांचा तपास अजिबात समाधानकारक नाही. बलात्कार झाल्यानंतर पीडितांनी पोलीस हेल्पलाईनच्या १00 क्रमांकावर वारंवार फोन लावला. तथापि, त्यावर कोणतीही मदत मिळाली नाही. यात दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरही गुन्हे नोंदविण्यात यावेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)>पोलीस अधीक्षक प्रतिवादीया प्रकरणात राज्याचे गृहसचिव, आझम खान, पोलीस महासंचालक, बुलंद शहरचे पोलीस अधीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.पीडितांची मानहानी केल्याबद्दल, तसेच मूलभूत हक्कांचा भंग केल्याबद्दल पीडितांना योग्य नुकसानभरपाई देण्याचे आदेश प्रतिवाद्यांना देण्यात यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.तसेच यापुढे पीडितांच्या मूलभूत हक्कांचा भंग होईल, असे कोणतेही वक्तव्य करू नये, असे आदेश देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे.