शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

अयशस्वी लिव्ह इन संबंधांमुळे बलात्कार वाढतात - हायकोर्ट

By admin | Updated: June 19, 2014 18:42 IST

अयशस्वी लिव्ह इन रिलेशनमुळे बलात्कारचे प्रमाण वाढत आहे असे महत्त्वपूर्ण मत दिल्ली हायकोर्टाने मांडले आहे.

 
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १९- अयशस्वी लिव्ह इन रिलेशनमुळे बलात्कारचे प्रमाण वाढत आहे असे महत्त्वपूर्ण मत दिल्ली हायकोर्टाने मांडले आहे. तरुणाई कोणताही विचार न करता एकमेकांशी नातेसंबंध निर्माण करत असल्याने काही काळाने त्यांच्यात ब्रेक अप होते असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले आहे. 
दिल्लीतील एका तरुणीच्या प्रियकराची तिच्या वडिल व अन्य चौघा नातेवाईकांनी हत्या केली होती. या चौघांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाचे न्या. कैलाश गंभीर आणि न्या. सुनिता गुप्ता यांच्या खंडपीठाने हे परखड मत नोंदवले आहे. हायकोर्ट म्हणाले, तरुणाईने विशेषतः तरुणींनी आणखी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. लग्न किंवा लिव्ह इनसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना मुलामुलींनी परिपक्वता दाखवणे गरजेचे आहे. 
बलात्काराचे प्रमाण वाढण्याचे कारण याविषयी हायकोर्ट म्हणते, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तरुणाईने बेजबाबदारपणे निर्णय घेतल्याने काही काळाने हे संबंध तुटतात. ब-याचदा शारिरीक संबंधांनतर नातेसंबंध संपुष्टात येतात. पालकांनीही संवेदनशीलपणा आणि परिपक्वता दाखवत याकडे बघितले पाहिजे. एकमेकांवरील विश्वास, समजूतदारपणा आणि सहनशीलता या आधारेच या मुद्द्यावर तोडगा काढणे शक्य आहे असे कोर्टाने नमूद केले. संबंधित प्रकरणात तरुणीच्या नातेवाईकांनी हाच समजूतदारपणा दाखवला असता तर आज एका तरुणाचा मृत्यू झाला नसता व मुलीच्या नातेवाईकांनाही तुरुंगवास घडला नसता असे न्यायालयाने सांगितले.